औरंगाबाद येथील मनोज आव्हाड च्या अमानुषपणे झालेल्या हत्येच्या निषेधार्थ आंदोलन
दलितांवरील वाढते अत्याचार रोखण्यासह विविध मागण्यांचे दिले जाणार निवेदन
अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) अहमदनगर पक्षाच्या वतीने औरंगाबाद येथील मातंग समाजातील युवक मनोज आव्हाड याचा अमानुषपणे झालेल्या हत्येचा निषेध नोंदविण्यासाठी व यामधील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालया समोर मंगळवारी (दि.10 मे) सकाळी 11 वाजता निदर्शने करण्यात येणार आहे.
केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले यांच्या आदेशानुसार सदरचे आंदोलन केले जाणार असून, जिल्ह्यातील जेष्ठ नेते, रिपब्लिकन पक्षाचे जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष, युवक आघाडी, महीला आघाडी, मराठा आघाडी, मुस्लिम आघाडी, मातंग आघाडी, आदिवासी पारधी आघाडी पदाधिकारी व सर्वच रिपाईच्या कार्यकर्त्यांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सर्व कार्यकर्त्यांना शासकीय विश्राम येथे सकाळी 10ः 30 वाजता येथे एकत्र येण्याचे सांगण्यात आले असून, त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात येणार आहे.
दलितांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी कडक अंमलबजावणी व्हावी, मागासवर्गीय भूमिहीन शेतमजुरांना 5 एकर गायरान जमीन देण्यात यावी, महात्मा फुले विकास महामंडळाच्या एनएफडीसी 4 व 5 लाख रुपयांचे कर्जपुरवठा तात्काळ करण्यात यावा, महात्मा फुले विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, चर्मोद्योग विकास महामंडळ व सर्व महामंडळा मार्फत कर्ज पुरवठा करण्यात यावा, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपमध्ये वाढ करुन ती वेळेवर देण्यात यावी, मागासवर्गीय शासकीय विद्यार्थी वसतीगृहांना अनुदानात वाढ करावी, ओ.बी.सी समाजाला राजकीय आरक्षण द्यावे, मराठा समाजाला आरक्षण द्यावे, मशिदीवरील भोंग्यातून दिली जाणारी अजानसाठी रितसर परवानगी देण्यात यावी, भोंग्यावरुन दोन समाजात तेढ निर्माण करणार्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी यावेळी केली जाणार आहे.
या आंदोलनासाठी शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, जिल्हा कार्याध्यक्ष लॉरेन्स स्वामी, जिल्हा उपाध्यक्ष विजय भांबळ, जेष्ठ नेते गौतम घोडके, विलास साठे, संजय कांबळे, धरम घायतडक, रविंद्र आरोळे, सुरेश भागवत, इंद्रजित शिंदे, उत्तर महाराष्ट्र राज्य सचिव अजय साळवे, महिला जिल्हाध्यक्ष आरती बडेकर, युवक जिल्हाध्यक्ष विवेक भिंगारदिवे, नगरसेवक राहुल कांबळे, मराठा आघाडी जिल्हाध्यक्ष महेंद्र झिंजाडे, मुस्लिम आघाडी शहराध्यक्ष साजिद शेख, शहर जिल्हा उपाध्यक्ष योगेश त्रिभुवन, युवक आघाडी जिल्हा सरचिटणीस गौरव साळवे, नगर तालुकाध्यक्ष अविनाश भोसले, नगर तालुका कार्याध्यक्ष कृपाल भिंगारदिवे, भिंगार शहराध्यक्ष आकाश तांबे, शहर उपाध्यक्ष प्रतिक नरवडे, महिला नगर तालुकाध्यक्ष कविताताई नेटके, युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रविण वाघमारे, महादेव भिंगारदिवे, अमित जाधव, तुषार साळवे, विशाल कदम, सुरज भिंगारदिवे, दत्ता कदम, शाम भोसले, पार्वती भोसले, संजय भैलुमे, अविनाश उमाप, संदेश पाटोळे, दिपक पाडळे, आकाश आरु, राजा जगताप, विशाल घोडके, गोरख सुर्यवंशी, यशराज शिंदे, अजय आंग्रे, विलास साळवे, बाबा राजगुरु, बाळासाहेब शिंदे, विजय बोरुडे, भाऊ वाघमारे, आशा पवार, नजमा शेख आदी प्रयत्नशील असल्याची माहिती जिल्हा प्रसिद्धी प्रमुख लोकेश बर्वे यांनी दिली.