राष्ट्रवादीच्या वतीने अभिवादन
शाहिरी व साहित्यातून अण्णाभाऊंनी उपेक्षितांच्या व्यथा मांडल्या -प्रा. माणिक विधाते
अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगारला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. इंदिरानगर येथे भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, दिलीप ठोकळ, नाथाजी राऊत, रमेश वराडे, अजय दिघे, शिवम भंडारी, गणेश शिंदे, सर्वेश सपकाळ, राष्ट्रवादी युवकचे शहर उपाध्यक्ष अभिजीत सपकाळ, सतीश सपकाळ, संतोष नामदे, विशाल बेलपवार, सदाशिव मांढरे, गणेश बोरुडे, व्यापारी सेलचे अनंत गारदे, लहू कराळे, उमेश धोंडे, अस्लम शेख, फैय्याज शेख, अर्जुन बेरड, मतीन ठाकरे, दीपक लिपाणे, सुंदर पाटील, मारुती पवार, अशोक पराते, रवींद्र घडसिंग, भारत ठोकळ आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रा. माणिक विधाते म्हणाले की, समाज जागृत करण्याचे काम अण्णाभाऊंनी केले. आपल्या शाहिरी व साहित्यातून त्यांनी उपेक्षितांच्या व्यथा मांडून त्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. त्यांचे विचार युवकांना प्रेरणा देणारे असल्याचे त्यांनी सांगितले. संजय सपकाळ यांनी अण्णाभाऊ साठे केवल लोकशाहीर नव्हे, तर ते दर्जेदार साहित्यिक होते. त्यांनी आपल्या साहित्यातून जनजागृतीचे कार्य केले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अण्णाभाऊंचे योगदान स्फुर्तीदायी असल्याचे त्यांनी सांगितले.