सिध्दी घाणेकर राज्यात सहावी
जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत पाचवीचे 21 तर आठवीचे सहा विद्यार्थ्यांना स्थान
अहमदनगर (प्रतिनिधी)- अ.ए.सो. च्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन करीत यशाची परंपरा कायम राखली. नुकतेच घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत इयत्ता पाचवीचे 21 विद्यार्थी तर इयत्ता आठवीच्या 6 विद्यार्थ्यांनी स्थान मिळवले. तसेच राज्याच्या गुणवत्ता यादीत इयत्ता आठवी मधील सिध्दी आशुतोष घाणेकर हिने राज्यात सहावी तर जिल्ह्यात तिसरी येण्याचा बहुमान पटकाविला.

या गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे खजिनदार प्रकाश गांधी, विद्यालयाचे मुख्याध्यापक उल्हास दुगड, उपमुख्याध्यापिका सुषमा चिटमील, पर्यवेक्षक रावसाहेब बाबर, रविंद्र शिंदे, आशा सातपुते आदी उपस्थित होते.
छायाताई फिरोदिया यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन गुणवत्ता टिकवून भवितव्य घडविण्याचे सांगितले. संस्थेचे सहकार्यवाह गौरव फिरोदिया, उपाध्यक्ष अशोक मुथा यांनी गुणवंत विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणार्या शिक्षकांचे अभिनंदन केले.
इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना वैशाली मेहेर, मनिषा कांबळे, अतुल बोरुडे, बाळासाहेब पालवे तर इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रगती बेगडे, दिपेश ओस्तवाल, राजलक्ष्मी कुलकर्णी, शिल्पा नगरकर या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत येण्याचा बहुमान पटकाविणारे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती इयत्ता पाचवीचे विद्यार्थी- ज्ञानेश्वरी गावडे, शिवराज तळेकर, अनुष्का भणभणे, श्रिया पांडव, संस्कृती पांडुळे, शंतनू घोडके, आयुष बोरुडे, अथर्व पैठणकर, उत्कर्ष माने, आदित्य धस, राजलक्ष्मी घडेकर, अक्षरा फुलसौंदर, तेजश्री वारुळे, समर्थ कुलकर्णी, सोहन शिंदे, अनुष्का हुलगे, दिया पटवा, अनुराज पोकळे, संस्कृती आनंदकर, ओंकार बडे, ऋग्वेद छिंदम,
तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवीचे विद्यार्थी- सिद्धी घाणेकर, सुरज तरटे, रचेत काबरा, गौरव भुकन, रितेश चौधरी, अदिती चेमटे आदी.
