• Thu. Mar 13th, 2025

पदवीधर मतदार संघाचे पोपट बनकर यांनी घेतले पद्मभूषण अण्णा हजारे यांचे आशीर्वाद

ByMirror

Jan 25, 2023

ठराविक राजकीय कुटुंबांची मक्तेदारी मोडीत काढून पदवीधारकांचे प्रश्‍न सोडविणार -बनकर

अहमदनगर (प्रतिनिधी)- नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचे अपक्ष उमेदवार तथा सामाजिक कार्यकर्ते पोपट बनकर यांनी ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांची राळेगणसिध्दी येथे भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.


प्रबळ आणि समृध्द लोकशाहीसाठी व भ्रष्टाचार मुक्त देश घडविण्याच्या उद्देशाने या निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहे. सामाजिक बदलासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी राजकारणात पुढे आले पाहिजे. मतदारांनी देखील प्रगल्भ लोकशाहीसाठी मतदानाचा हक्क बजविण्याचे उमेदवार बनकर यांनी आवाहन केले.

तर शिक्षण क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी व ठराविक राजकीय कुटुंबांची मक्तेदारी मोडीत काढून पदवीधारकांचे प्रश्‍न सोडविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी अ‍ॅड. महेश शिंदे, सागर आलचेट्टी, प्रा. नवनाथ जाधव, बाबासाहेब पवार, प्रा. गणेश चव्हाण, आरीफ पठाण, डॉ. रविंद्र शिंदे, राजेश पाटोळे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *