• Thu. Mar 13th, 2025

पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार बनकर यांना स्वयंसेवी संस्थांचा पाठिंबा

ByMirror

Jan 27, 2023

राज्यातील स्वयंसेवी संघटनांशी संलग्न असलेल्या जय असोसिएशन ऑफ एनजीओच्या पाठिंब्याचे पत्र

अहमदनगर (प्रतिनिधी)- नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार तथा सामाजिक कार्यकर्ते पोपटराव बनकर यांना जय असोसिएशन ऑफ एनजीओ महाराष्ट्र राज्य संघटनेने पाठिंबा दिला. विविध स्वयंसेवी एनजीओचे संघटन असलेल्या या संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. महेश शिंदे यांनी नुकतेच बनकर यांना पाठिंब्याचे पत्र दिले.


अ‍ॅड. महेश शिंदे म्हणाले की, सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवाराला पदवीधराचे प्रश्‍न सोडविण्यासाठी विधीमंडळात पाठविण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील सामाजिक संस्थाचे पदाधिकारी असलेले पोपटराव बनकर निस्वार्थ भावनेने कार्य करत आहे. त्यांचे सामाजिक कार्यामुळे स्वयंसेवी संघटना त्यांना पाठबळ देणार आहे. बनकर यांना मताधिक्याने निवडून देण्यासाठी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी त्यांना संधी देण्याचे आवाहन त्यांनी केले.


उमेदवार पोपटराव बनकर म्हणाले की, मला प्रत्येक मतदारांनी शंभर टक्के निवडून देणार असल्याचे अभिवचन दिले आहे. फक्त समोर न येता अनपेक्षित निकाल पहावयास मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षकांचे प्रश्‍न, जुनी पेन्शन योजना, वकील बांधवांच्या समस्या, अभियंता, वैद्यकीय तज्ञांच्या समस्या, दिव्यांग, पदवीधारकांचे त्याचबरोबर सुशिक्षित बेरोजगार युवकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अभिवचन त्यांनी दिले. तर जय असोसिएशन ऑफ एनजीओ महाराष्ट्र राज्य संघटनेच्या पाठिंब्याने प्रस्थापित घराणेशाहीला व धनशक्ती विरोधात हा लढा असून, धक्कादायक निकालाची नोंद होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


यावेळी जय युवाच्या जयश्री शिंदे, रयतच्या स्वाती बनकर, उडान फाऊंडेशनच्या अध्यक्षा आरती शिंदे, प्रगती फाऊंडेशनच्या अध्यक्षा अश्‍विनी वाघ, अनिता गणगे, उमंग फाऊंडेशनचे डॉ. संतोष गिर्‍हे, अहिल्या फाऊंडेशनच्या कावेरी कैदके, अकोले येथील सप्तश्रृंगी संस्थेच्या मीना म्हसे, पाथर्डी येथील मानवसेवाचे अध्यक्ष प्रा. सुनील मतकर, रावसाहेब मगर, जयश्री कुलथे, नयना बनकर, गणेश टाळके, शिवाजी नवले, अ‍ॅड. पुष्पा जेजुरकर, किशोर मोरे, सुनील सकट, भारती शिंदे, सिमोन बनकर, सुनील तोडकर, विजय भालसिंग, सलीम सय्यद, सचिन मेहेते, अजय मुरकुटे, उषा कपिले, सचिन हिरवे, भीमराव उल्हारे, नाशिकचे विनोद वैद्य, विजय शेवाळे, अमोल शिरसाठ, संजय चेचरे, गणेश बनकर, आदी पाचही जिल्ह्यातील सर्व स्वयंसेवी संस्था पदाधिकार्‍यांनी बनकर जाहीर पाठिंबा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *