देशभरातील स्पर्धकांचा होता सहभाग
अहमदनगर (प्रतिनिधी)- बेटर किचन ऑफ इंडिया इंटरनॅशनल अकॅडमीच्या वतीने मुंबई मध्ये घेण्यात आलेल्या नॅशनल लेवल क्युटिकल होम शेफ कॉम्पिटिशन मध्ये नगरच्या दिपाली बिहाणी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत देशभरातून तब्बल पन्नासपेक्षा जास्त स्पर्धक सहभागी झाले होते.

या स्पर्धेत सहा राउंड घेण्यात आले. स्टार्टर, मेन कोर्स व डेसर्ट बनविण्याचे लाईव्ह स्पर्धा पार पडली. प्रत्येक राऊंडमध्ये बिहाणी या अव्वल ठरल्या. स्पर्धेचे परीक्षण उपस्थित असलेल्या मिशलिन इंटरनॅशनल शेफ यांनी केले. स्पर्धेसाठी महाराष्ट्रासह भुवनेश्वर, कटक, ओडिसा, कलकत्ता, कश्मीर, पंजाब, राजस्थान व गुजरात येथील स्पर्धक सहभागी होते. अत्यंत अवघड पद्धतीने व पाककलेची गुणवत्ता पडताळून ही स्पर्धा पार पडली.
स्पर्धेतील प्रथम विजेत्या बिहाणी यांना क्रॉम्प्टन कंपनीचे सीईओ व बेटर किचन ऑफ इंडियाचे सीईओ एकता भार्गव यांच्या हस्ते प्रमाणपत्र, ग्रील विथ मायक्रोवेव्ह व विविध प्रकारचे आकर्षक गिफ्ट बक्षिस स्वरुपात देण्यात आले. या स्पधचे मुख्य प्रायोजक बेटर किचन ऑफ इंडिया व क्रॉम्प्टन कंपनी होती. राष्ट्रीय स्तरावरच्या पाककला स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल बिहाणी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.