गावात स्वच्छता अभियान राबवून, केली मतदार जागृती
आरोग्यासाठी सार्वजनिक स्वच्छता महत्त्वाची -पै. नाना डोंगरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- स्पर्धामय युग व महागाईच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना खर्चिक आरोग्य सुविधा मिळणे कठिण झाले आहे. आरोग्यसेवेचा खर्च त्यांना पेळवत नसून, विविध मोफत शिबीर सर्वसामान्यांसाठी आधार ठरत आहे. आरोग्यासाठी सार्वजनिक स्वच्छता महत्त्वाची असून, यासाठी सार्वजनिक स्वच्छतेसाठी सर्वांनी योगदान देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांनी केले. तर युवकांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवून लोकशाही बळकट करण्याचे यावेळी आवाहन करण्यात आले.
निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्वास्तिक नेत्रालय, वैष्णवी ऑप्टीकल्स, स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व निमगाव वाघा ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्रतपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबीराच्या उद्घाटनाप्रसंगी डोंगरे बोलत होते. स्वच्छता अभियानाने शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सरपंच रुपाली जाधव, माजी सरपंच साहेबराव बोडखे, ग्रामविकास अधिकारी गोवर्धन राठोड, भागचंद जाधव, ग्रामपंचायत सदस्य मुन्नाबी शेख, किरण जाधव, प्रमोद जाधव, दिपक गायकवाड, उज्वला कापसे, डॉ. विजय जाधव, दिगंबर जाधव, अतुल फलके, जालिंदर आतकर, नासिर शेख, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, दिपक जाधव, मुस्ताक शेख, नवनाथ फलके, सभाजी गायकवाड, सोमा आतकर, सदा बोडखे, सचिन कापसे, प्रतिभा डोंगरे, राजू जाधव आदी उपस्थित होते.
मतदार जागृती अभियान राबवून, उपस्थितांना मतदानाचा हक्क बजाविण्याची शपथ देण्यात आली. गावातील नवनाथ मंदिराच्या सभा मंडपात झालेल्या या शिबीरास ग्रामस्थांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. डॉ. ओंमकेश कोंडा व डॉ. वैष्णवी जरबंडी यांनी ग्रामस्थांची नेत्र तपासणी केली. या शिबीरात सहभागी झालेल्या गरजू लाभार्थींवर अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या शिबीरासाठी नेहरु युवा केंद्राचे उपनिदेशक शिवाजी खरात व जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांचे मार्गदर्शन लाभले.