सोसायटीची धुरा लोंढे समर्थपणे पेलवत आहे -विजय भालसिंग
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील नालेगाव सोसायटी बिनविरोध झाल्याबद्दल सोसायटीचे चेअरमन पैलवान संभाजी लोंढे यांचा सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी सत्कार केला. यावेळी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष राजूभाऊ लोटके पाटील, संतोष झुंगे, रुपेश धुमाल आदी उपस्थित होते.
विजय भालसिंग म्हणाले की, नालेगाव सोसायटीची धुरा पैलवान संभाजी लोंढे यांनी समर्थपणे पेलवत आहे. सभासदांचे हिताचे निर्णय घेऊन त्यांना अनेक योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. त्यांच्या उत्कृष्ट कार्यामुळे सर्व सभासद व संचालकांनी त्यांच्यावर विश्वास टाकून सोसायटी बिनविरोध केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेली सोसायटीची विकासात्मक वाटचाल कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. सत्काराला उत्तर देताना पैलवान संभाजी लोंढे यांनी नालेगाव सोसायटीच्या माध्यमातून सभासदांच्या उन्नतीसाठी विविध उपक्रम राबविले जात असून, सभासदांच्या हितासाठी सोसायटीच्या माध्यमातून कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.