नगर तालुका क्रीडा समितीच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याचा सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुका क्रीडा समितीच्या उपाध्यक्षपदी पै. नाना डोंगरे यांची निवड झाल्याबद्दल नगर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने संघाचे अध्यक्ष भाऊसाहेब रोहोकले यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी निळकंठ वाघमारे, आशा भाऊसाहेब रोहोकले, नंदा वाघमारे, वर्षा रोहोकले, प्रसाद वाघमारे आदी उपस्थित होते.
भाऊसाहेब रोहोकले म्हणाले की, नगर तालुक्यातील क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी पै. नाना डोंगरे यांचे सातत्याने सुरु असलेले योगदान प्रेरणादायी आहे. मागील वीस वर्षापासून डोंगरे कुस्तीसह इतर खेळाच्या विविध स्पर्धा घेऊन खेळाडूंना प्रोत्साहन देत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत मजल मारली असून, डोंगरे क्रीडा क्षेत्रातील भूषण असल्याचे त्यांनी सांगितले.
निळकंठ वाघमारे यांनी ग्रामीण भागातील खेळाडूंना नेहमीच डोंगरे यांनी प्रोत्साहन दिले आहे. शहराप्रमाणे विविध क्रीडा स्पर्धा गाव पातळीवर घेण्याचा त्यांचा नेहमीच मानस असतो. आपल्या दोन्ही मुलींना राष्ट्रीय खेळाडू बनवून त्यांनी एक आदर्श निर्माण केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.