• Wed. Feb 5th, 2025

दिव्यांगांसाठी कार्य करणारे महेश बारगजे यांना सामाजिक कार्य गौरव पुरस्कार प्रदान

ByMirror

Jun 26, 2022

नाशिक येथील दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ व अस्तित्व सोशल फाउंडेशनच्या वतीने सन्मान

अहमदनगर (प्रतिनिधी)- दिव्यांगांसाठी कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते महेश बारगजे यांना नाशिक येथील दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ व अस्तित्व सोशल फाउंडेशनच्या वतीने सामाजिक कार्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


नाशिकच्या कालिदास कलामंदिर मध्ये योग व सामाजिक क्षेत्रात कार्य करणार्‍यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये नगरचे बारगजे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना कामगार नेते संतोष जाधव, राष्ट्रीय अध्यक्ष महेंद्र देशपांडे, योग पंडित डॉ. पूनम बिरारी, बालहक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या सायली पालखेडकर, सुवर्णा कोठावदे, उद्योजिका शबनम खान यांच्या उपस्थिती मध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आला.


महेश बारगजे हे स्वत: दिव्यांग असून, ते दिव्यांग बांधवांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी कार्यरत आहे. तसेच विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून वंचित, दुर्बल घटकांसाठी कार्य करत असतात. दिव्यांगांना प्रवाहात आनण्यसाठी व शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ त्यांना मिळण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. दिव्यांगांना सायकल व इतर गरजेच्या वस्तू मिळवून देणे, त्यांच्या नोकरीसाठी मार्गदर्शन, कर्ज योजनेचा लाभ, दिव्यांगांना सक्षम करण्यासाठी ते योगदान देत असून, त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना सामाजिक कार्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल शेखर बोत्रे, रत्नाकर ठाणे, विवेक बंडी, सचिन खडावकर, किरण गोरे, गोपीनाथ म्हस्के, चंद्रकांत वाघमारे आदींनी बारगजे यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *