निमगाव वाघा येथे आनंद अनुभूती प्रशिक्षण शिबीराचे आयोजन
अहमदनगर (प्रतिनिधी)- तणावमुक्त व आनंदी जीवन जगण्यासाठी नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे द आर्ट ऑफ लिव्हिंग, स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने आनंद अनुभूती या पाच दिवसीय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजी महाराज व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त हे शिबिर होणार आहे.
या शिबीराचा प्रारंभ मंगळवार दि.16 मे रोजी होणार असून, यामध्ये पंचक्रोशीतील ग्रामस्थांना सहभागी होण्याचे आवाहन आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक रामचंद्र लोखंडे, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, विशाल गावडे व विष्णू शिंदे यांनी केले आहे.
मंगळवार पासून गावात दररोज संध्याकाळी 7 ते 10 वाजे पर्यंन्त हे शिबीर नवनाथ मंदिरात चालणार आहे. यामध्ये योग, प्राणायाम, ध्यानबाबत प्रशिक्षण देऊन आयुष्यातील ताण, तणाव मुक्तीसाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. तर मानसिक व अध्यात्मसंदर्भात तज्ञ मंडळी बोलणार आहेत. वयोवर्षे 18 पुढील युवक-युवतींसह सर्व ग्रामस्थांना या प्रशिक्षण शिबिरात सहभागी होता येणार असून, याचा समारोप शनिवार दि.20 मे रोजी होणार आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी रामचंद्र लोखंडे 9623173697, पै.नाना डोंगरे 9226735346, विशाल गावडे 9403318705 यांना संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे. सदर शिबिर नेहरु युवा केंद्राचे उपनिदेशक शिवाजी खरात व जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.