वृक्षरोपण ही एक समाजसेवा -सरपंच रावसाहेब कर्डिले
अहमदनगर (प्रतिनिधी)- वृक्षरोपण ही एक समाजसेवा असून, भविष्यातील सुखी जीवन पर्यावरणावर विसंबून आहे. पर्यावरणाचे प्रश्न गंभीर बनल्यास मनुष्याचे जीवन खडतर होणार आहे. जय हिंद फाउंडेशनने जिल्ह्यातील डोंगर रांगा, उजाड माळरान हिरावाईने फुलविण्यासाठी घेतलेला उपक्रम प्रेरणादायी असून, या संघटनेच्या योगदानातून वृक्षरोपण चळवळीला गती मिळाली असल्याचे प्रतिपादन बुर्हाणनगरचे सरपंच रावसाहेब कर्डिले यांनी केले.

जय हिंद फाउंडेशनच्या वतीने तपोवन रोड, साईनगर येथील संत वामनभाऊ व विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. यावेळी सरपंच कर्डिले बोलत होते. याप्रसंगी सोसायटीचे संचालक श्रीधर पानसरे, शांताराम कर्डिले, माजी चेअरमन रंगनाथ कर्डिले, व्हाईस चेअरमन सागर भगत, तात्या कर्डिले, ह.भ.प. राम महाराज घुले, फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, भाऊसाहेब कर्पे, निळकंठ उलारे, लहुजी सुलाखे, अंबादास बडे, गणेश पालवे, भाऊसाहेब देशमाने, कुमार बांगर, विनायक चौधर, अमोल गोल्हार, प्रशांत चौधर, कुमार पालवे, गोरक्ष चौधरी, गोरक्ष सांगळे, अजय पाचरणे, विनय आव्हाड, पोपट पालवे, बाबासाहेब आव्हाड, संतोष शिंदे, दिगंबर डमाळे, हौऊसराव पालवे, राजाराम कर्डिले, शरद हरिश्चंद्रे, निलेश भगत आदी उपस्थित होते.

शिवाजी पालवे म्हणाले की, कोरोनामध्ये ऑक्सिजनचे महत्त्व सर्वांना कळाले. ऑक्सिजनशिवाय जीवन नाही. यामुळे ऑक्सिजन देणारी झाडे लावणे काळाची गरज बनली आहे. पर्यावरणाचे समतोल साधण्यासाठी वृक्षरोपण चळवळीत प्रत्येकाने योगदान देण्याची गरज असून, प्रत्येकाने एक झाड लावून त्याचे संवर्धन करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या भागात फाऊंडेशनच्या वतीने विविध देशी प्रकारचे ऑक्सिजन देणारी झाडे लावण्यात आली असून, संत वामनभाऊ प्रतिष्ठानच्या वतीने ही झाडे जगविण्यासाठी दत्तक घेण्यात आली आहे. उपस्थितांचे आभार प्रतिष्ठानचे कुमार बांगर यांनी मानले.