शहराच्या व्यापार व औद्योगिकरणाला गती देण्याचे काम मर्चंट्स बँकेने केले -जनक आहुजा
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या चेअरमनपदी हस्तीमल मुनोत यांची निवड झाल्याबद्दल घर घर लंगर सेवेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी लंगर सेवेचे जनक आहुजा, हरजितसिंह वधवा, प्रितपाल सबलोक, राजेंद्र कंत्रोड, राजू जग्गी, कैलाश नवलानी आदी उपस्थित होते.
जनक आहुजा म्हणाले की, शहराच्या व्यापार व औद्योगिकरणाला गती देण्याचे काम मर्चंट्स बँकेच्या माध्यमातून झाले आहे. सहकार क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तीमत्व असलेले हस्तीमल मुनोत यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेने नावलौकिक मिळवला आहे. त्यांचा अनुभव व बँकिंग क्षेत्रातील अभ्यासाने बँक प्रगतीपथावर जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हरजितसिंह वधवा यांनी व्यापार व उद्योग क्षेत्राताला चालना देण्याचा प्रयत्न मर्चंट्स बँकेचा राहिला असून, अनुभवी तज्ञ व्यक्तीची चेअरमनपदी झालेली नियुक्ती विकासात्मक वाटचालीच्या दिशेने राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पहिल्यांदाच संचालक झालेले किशोर मुनोत यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.