• Fri. Jan 30th, 2026

गुलमोहर रोडला चित्रकला व शिवकालीन वेशभूषा स्पर्धेतून अवतरली शिवशाही

ByMirror

Feb 21, 2023

शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, संभाजी महाराज, तानाजी मालुसरे यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष

महाराजांचा इतिहास आणि स्वराज्य लढा भावी पिढीला ज्ञात होण्यासाठीचा उपक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, संभाजी महाराज, तानाजी मालुसरे व मावळ्यांच्या वेशभूषेत गुलमोहर रोड येथे आलेल्या बोलगोपालांमुळे अक्षरश: प्रत्यक्षात शिवशाही अवतरली होती. तर शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेचे विविध प्रसंग चित्रातून रेखाटून विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या राजाला अभिवादन केले. निमित्त होते, छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर यांनी राष्ट्रमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि स्वराज्य लढा भावी पिढीला ज्ञात होण्यासाठी घेतलेल्या चित्रकला व शिवकालीन वेशभूषा स्पर्धेचे.


या स्पर्धेचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले. यावेळी नाट्य कलाकार मोहनीराज गटणे, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर, सुमित कुलकर्णी, सुजाता दिवटे, धीरज उकिर्डे, अंजली आव्हाड, अभिजीत खरात, अ‍ॅड. राजेंद्र शितोळे, कुमार नवले, अ‍ॅड. योगेश नेमाने, अमोल बळे, आशुतोष पानमळकर, डॉ.सौरभ पंडित, मयूर रोहोकले, तेजस अतितकर, ओंकार म्हसे, केतन ढवण, संदीप गवळी, अक्षय नागवडे, डॉ. केतन गोरे, निहाल जाधव, बर्वे, अक्षय चव्हाण, शोभित खुराणा, जयंत जर्‍हाड, साहिल पवार, गोकुळ गोधडे, निशिकांत महाजन, अ‍ॅड. अमित गाडेकर, धीरज खिस्ती, समृद्ध दळवी, रवींद्र राऊत, अनिकेत पानमळकर आदी उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, मोबाईलमध्ये गुंतलेल्या पिढीला आपल्या महापुरुषांचा ज्वाजल्य इतिहास माहिती होण्याची गरज आहे. इतिहास विसरलेली पिढी उज्वल भवितव्य घडवू शकत नाही. यासाठी राजमाता जिजाऊंनी शिवरायांवर ज्या प्रमाणे संस्कार रुजवले आजच्या पिढीत हे संस्कार रुजण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.


इंजि. केतन क्षीरसागर म्हणाले की, शिवाजी महाराजांची जयंती फक्त डिजेवर नाचून साजरी करण्यासाठी नव्हे, तर त्यांचे विचार अंगीकारण्यासाठी आहे. त्यांचे विचार भावी पिढीला देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद व महाराजांच्या विचारांच्या जय जयकारने खरी शिवजयंती साजरी झाल्याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार संग्राम जगताप यांच्या संपर्क कार्यालया समोर रंगलेल्या या स्पर्धेत तीनशेपेक्षा जास्त विविध वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांनी शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. चित्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावरील प्रसंग रेखाटले. तर विविध वेशभूषेत आलेल्या विद्यार्थ्यांनी शिवकालीन प्रसंग आपल्या कलाविष्कारातून जिवंत केला होता. यावेळी गगन भेदी शिवरायांच्या जयघोषाने परिसर दणाणला.

अ गट (6 ते 10 वयोवर्षे) व ब गट (11 ते 16 वर्ष वयोवर्ष) या दोन गटात चित्रकला आणि 4 ते 8 वयोवर्षाच्या गटात वेशभूषा स्पर्धा पार पडली. विजेते व स्पर्धेत उत्कृष्ट ठरलेल्या स्पर्धकांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण जोशी, घनश्याम सानप यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण घुले यांनी केले. आभार यांनी मानले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी दीपक वाघ, ललित क्षीरसागर, निहाल जाधव, मयूर रोहोकले, चेतन क्षीरसागर, विराज जाधव, रुपेश क्षीरसागर, ओंकार म्हसे, अक्षय चव्हाण, पंकज शेंडगे, साहिल पवार, प्रशांत पालवे, केतन ढवण, निलेश ढवण, अहिल्या फाऊंडेशन आणि मेकओव्हर इन्स्टिट्यूटचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *