युवकांनी रक्तदान करुन दिली छत्रपतींना मानवंदना
श्रीराम मित्र मंडळ व राज प्रतिष्ठानचा उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील युवकांनी रक्तदान करुन छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली. श्रीराम मित्र मंडळ व राज प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेल्या शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिरात युवकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.
नगर-पुणे रोड, भूषणनगर येथील निशा पॅलेस येथे झालेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन उद्योजक सचिन (आबा) कोतकर यांच्या हस्ते झाले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरसेवक मनोज कोतकर, सामाजिक कार्यकर्ते गणेश ननावरे, नगरसेवक राहुल कांबळे, माजी नगरसेवक सुनील कोतकर, भूषण गुंड, दत्ता खैरे, सागर सातपुते, गणेश सातपुते, अजित कोतकर, अशोक कोतकर, मच्छिंद्र कोतकर, युवा नेते उमेश कोतकर, पै. सुरज शेळके, महेश सरोदे, अण्णा शिंदे आदींसह युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उमेश कोतकर म्हणाले की, स्वराज्यासाठी अनेक मावळ्यांनी रक्त सांडले, महाराजांचे विचार व त्यांच्या स्वराज्याच्या लढ्याची जाणीव ठेऊन रक्तदानाने युवकांनी महाराजांना केलेला अभिमान प्रेरणादायी आहे. रक्तासाठी मनुष्याला मनुष्यावरच अवलंबून रहावे लागत असल्याने माणुसकीच्या भावनेने रक्तदान चळवळ म्हणून राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
उद्योजक जालिंदर कोतकर रक्तदान हे गरजूंसाठी जीवदान ठरत असून, रक्तदानासारखे दुसरे पुण्य नाही. युवकांनी केलेल्या रक्तदानाने अनेकांचे जीव वाचणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रक्तदान शिबिरासाठी अर्पण ब्लड बँक यांचे विशेष सहकार्य लाभले.
