वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या कार्याचा सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका किशोरी शिवाजी भोर यांना सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. सृष्टी बहुउद्देशीय संस्था अंबाजोगाईच्या वतीने भोर देत असलेल्या शैक्षणिक योगदानाबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

करुणा शर्मा-मुंडे यांच्या हस्ते भोर यांना प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पुरस्कार देण्यात आला. भोर या केडगाव येथील जिल्हा परिषदेच्या जगदंबा क्लास प्राथमिक शाळेत शिक्षिका आहेत. त्या गरजू व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष योगदान देत आहे.
विविध सामाजिक उपक्रम राबवून दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना सातत्याने आधार देण्याचे त्यांचे कार्य सुरु आहे. या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल केडगाव बीटच्या विस्तार अधिकारी निर्मला साठे, केडगाव केंद्राचे केंद्रप्रमुख दिलीप दहिफळे, मुख्याध्यापक कानिफनाथ गुंजाळ, राजेंद्र वाघमारे, तंत्रस्नेही शिक्षक राजेंद्र वाबळे, सिमा खाजेकर, धन्वंतरी बंगाळ, सुषमा तरडे यांनी अभिनंदन केले.
