अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी मध्ये दरोडा टाकलेल्या, जीवघेणा हल्ला व मोक्काची कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची जामीनावर मुक्तता करण्याचे आदेश नुकतेच जिल्हा न्यायालयाने दिले असल्याची माहिती अॅड. योगेश नेमाने यांनी दिली.
शहरातील एमआयडीसीच्या एका कंपनीमध्ये सहा ते सात जणांच्या टोळीने 22 ऑक्टोंबर 2021 रोजी दरोडा टाकून जीवघेणा हल्ला केला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटकेत असलेले आरोपी विरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली होती. तपास अधिकारी यांनी तपास पूर्ण करून पंकज बापू गायकवाड व इतर आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करुन, आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई देखील करण्यात आली.
या खटल्यामध्ये पंकज बापू गायकवाड या आरोपीकडून अॅड. नेमाने यांनी बाजू मांडली. सदर सुनावणी दरम्यान अॅड. नेमाने यांनी आरोपीतर्फे न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. जामीन अर्जावर सुनावणी होऊन, अॅड. योगेश नेमाने यांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन सत्र न्यायाधीश एम.व्ही. कुर्तडीकर यांनी 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीनवर सुटका करण्याचे आदेश दिले. सदर अर्जकामी अॅड. नेमाने यांना अॅड. प्रसाद परदेशी, अॅड. नामदेव सारुक, अॅड. शुभम बंब, अॅड. अमोल गरड यांनी सहकार्य केले.