सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात प्रा. विधाते यांचे कार्य दिशादर्शक -गणेश बोरुडे
अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात प्रा. माणिक विधाते यांचे कार्य दिशादर्शक असून, सामाजिक नाते जोडणारे नेतृत्व म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली आहे. समाजकारण या भावनेने ते राजकारणात योगदान देत असून, अनेक युवकांना त्यांनी घडविले असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे सरचिटणीस गणेश बोरुडे यांनी केले.
शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तपदी प्रा. माणिक विधाते यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा तपोवन रोड येथील आमदार संग्राम जगताप मित्र मंडळ व लक्ष्मी कॉलनी मित्र मंडळाच्या वतीने नागरी सत्कार कारण्यात आला. यावेळी बोरुडे बोलत होते. यावेळी पारस कानडे, गिरी सर, घाडगे, सब्बन, पोटे, सिद्धार्थ जगताप, अक्षय घोडके, कैलास मैत्रे, पो. कॉ. रोहिदास नवगिरे, शिंदे, अनिल कुसमुडे, गौरव उंडे, चौरे, कुलदीप केंद्रे, अंबादास छिंदम, दत्तात्रय दातीर, गणेश केदारी, डुकळे, गांगर्डे, दीपक गायकवाड आदींसह नागरिक उपस्थित होते.