• Wed. Feb 5th, 2025

आझाद प्रतिष्ठान व रिपाईच्या वतीने सर्व धर्मियांसाठी मोहरमचा भंडारा

ByMirror

Aug 6, 2022

अहमदनगर (प्रतिनिधी)- मोहरम निमित्त आझाद प्रतिष्ठान व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (गवई) सर्व धर्मियांसाठी भंडार्‍याचे (खिचडा) आयोजन करून धार्मिक एकतेचे दर्शन घडविले. सर्व धर्मिय कार्यकर्त्यांनी एकत्रित येत सर्जेपुरा गोकुळवाडी येथे भंडार्‍याचे आयोजन केले होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष दानिश शेख यांच्या पुढाकाराने हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, इम्रान शेख, सोनू शेख, कैफ शेख, मतीन शेख, हाफिज शेख, मझहर शेख,अ झीम खान, अरबाज शेख, सुफीयान पटेल, अकीब शेख, तौफिक शेख, जहीर शेख, शेरा काझी, अयान शेख, ओसामा शेख, आशिष गायकवाड, भीम वाघचौरे, तन्मय वाघमारे, हसीब खान, अकिब सय्यद, इरफान शेख, कार्तिक म्हस्के, अरबाज सय्यद, जाफर काझी आदी उपस्थित होते.


दानिश शेख म्हणाले की, मोहरम निमित्त दरवर्षी प्रतिष्ठानच्या वतीने भंडार्‍याचे आयोजन केले जाते. या भागात सर्व धर्मिय गुण्यागोविंदाने नांदत असून, एकमेकांच्या सण उत्सवात सहभागी होत असतात. सर्व धर्मिय कार्यकर्त्यांनी एकत्र येत हा उपक्रम राबविल्याचे त्यांनी सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *