शिक्षण क्षेत्रातील व्यक्ती राजकीय सामाजिक क्षेत्रात आपले कर्तृत्व सिध्द करीत असल्याचे अभिमान -बाबासाहेब बोडखे
अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षण क्षेत्रात योगदान देऊन प्रा. माणिक विधाते समाज घडविण्याचे कार्य करत आहे. धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे. त्यांनी प्रामाणिकपणे दिलेल्या योगदानाची पावती म्हणून त्यांची विविध ठिकाणी वर्णी लागली. शिक्षण क्षेत्रातील व्यक्ती राजकीय सामाजिक क्षेत्रात आपले कर्तृत्व सिध्द करीत असल्याचे अभिमान वाटत असल्याचे प्रतिपादन शिक्षक परिषदेचे नेते तथा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे यांनी केले.
शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तपदी प्रा. माणिक विधाते यांची निवड झाल्याबद्दल अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीत त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोडखे बोलत होते. याप्रसंगी प्राचार्य शिवाजी घाडगे, सागर देशमुख, श्रेयश आंग्रे, दत्तात्रय कुंजीर, प्रफुल्ल माने, गणेश बोरुडे, कैलास मोकळे, सुनिल अकोळकर, बंडू गायकवाड, काशीनाथ मते आदी उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना प्रा. माणिक विधाते यांनी शैक्षणिक क्षेत्रात योगदान देऊन समाजासाठी वेळ देऊन कार्य करत आहे. शिक्षकाप्रमाणे दूरदृष्टी ठेऊन विकासात्मक व्हिजनने कार्य सुरु असल्याचे स्पष्ट केले.