ग्रुपच्या सदस्यांनी मिळवलेले यश ग्रुपच्या दृष्टीने अभिमानास्पद -जनक आहुजा
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर क्लब बॅडमिंटन ग्रुप मधील सदस्यांची विविध ठिकाणी निवड झाल्याबद्दल त्यांचा ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला. हिंद सेवा मंडळाच्या अध्यक्षपदी शिरीष मोडक यांची बिनविरोध, अहमदनगर क्लबच्या संचालकपदी अॅड. जयंत भापकर निवडून आल्याबद्दल, सहकार संचालकपदी डॉ. रविंद्र सोमानी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
नगर क्लब येथे झालेल्या सत्कार सोहळ्याप्रसंगी जनक आहुजा, रविंद्र बक्षी, किशोर मुनोत, हेमचंद्र इंगळे, किशोर भिंगारवाला, विवेक हेगडे, श्याम रेनावीकर, प्रभाकर बोरकर, लक्ष्मीनिवास सारडा, डॉ. अरविंद शेळके, जवाहर मुथा, डॉ. रंगनाथ सांगळे, डॉ. कल्याण भोसले, किरण व्होरा, बाबुशेठ कराचीवाला, सुनिल मुथा, धनेश बोगावत, अनिल शर्मा, डॉ. मोहन थोलार, डॉ. विजय सोनार आदी उपस्थित होते.
जनक आहुजा म्हणाले की, नगर क्लब मध्ये अनेक वर्षापासून बॅडमिंटन खेळणार्या मित्रांचा एक ग्रुप बनला आहे. या ग्रुप मधील व्यक्ती विविध क्षेत्रात योगदान देत असून, त्यांची विविध महत्त्वाच्या ठिकाणी निवड झाली आहे. ग्रुपच्या सदस्यांनी मिळवलेले यश ग्रुपच्या दृष्टीने अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. सत्कारमुर्तींनी ग्रुपच्या सदस्यांचे प्रत्येक कामात साथ मिळत असून, त्यांचा सत्कार हा पुढील कार्याच प्रेरणा देणारा ठरणार असल्याचे स्पष्ट केले.