• Thu. Jan 16th, 2025

अरणगावला अल्पवयीन मुलाचे अपहरण

ByMirror

Apr 15, 2022

अहमदनगर (प्रतिनिधी)- अरणगाव येथे अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याप्रकरणी नगर तालुका पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
10 एप्रिल रोजी संतोष ज्ञानेश्‍वर डव्हारे (वय 17 वर्षे, रा. शिंदेवाडी, अरणगाव) सकाळी साडेआठ वाजता कोणाला न सांगता घराबाहेर पडला. संध्याकाळी उशीरा पर्यंत तो घरात पुन्हा आला नाही. नातेवाईक व गाव परिसरात विचारपूस केल्यानंतरही त्याचा शोध लागला नाही. त्याचे वडिल ज्ञानेश्‍वर डव्हारे यांच्या फिर्यादीवरुन 11 एप्रिल रोजी मुलाला पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष डव्हारे सडपातळ बांध्याचा निमगोरा व त्याची उंची 165 सेमी आहे. त्याने घराबाहेर पडताना ग्रे कलरचा ट्रॅकसुट घातलेला आहे. सदर मुलगा कोणाला सापडल्यास त्यांनी पोलीसांशी अथवा मो.नं. 7038219005 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *