अहमदनगर (प्रतिनिधी)- अमेरिकेतील जागतिक दर्जाच्या प्राईज वॉटर हाऊस कुपर (पीडब्ल्यूसी) या कंपनीत नगरचे सीए अभिजित विधाते याची डायरेक्टर म्हणून पदोन्नती झाली आहे. 1 जुलै पासून तो या कामाचा पदभार स्विकारणार आहे.
अभिजीत हा राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते यांचा मुलगा असून, तो उत्कृष्ट क्रिकेट खेळाडू आहे. पीडब्ल्यूसी ही अमेरिकेतील अकाऊंट क्षेत्रातील नामवंत कंपनी असून, विविध देशात त्यांच्या शाखा आहेत. सीए विधाते हे 2015 पासून या कंपनीत कार्यरत आहे. सीए म्हणून काम करताना तो 2017 साली मॅनेजर, 2019 साली सिनीयर मॅनेजर तर 2023 मध्ये त्याची डायरेक्टर म्हणून निवड झाली आहे. त्याने स्वकर्तृत्वाने कर्मचारी ते डायरेक्टर पदा पर्यंतचा टप्पा गाठला आहे.
सीए विधाते याचे प्राथमिक शिक्षण रामकृष्ण इंग्लिश मिडीयम स्कूल, तर महाविद्यालयीन शिक्षण अहमदनगर महाविद्यालयात झाले आहे. त्याने एमकॉम व सीए पुणे येथे केले. तो नेट परीक्षा देखील उत्तीर्ण आहे. जागतिक दर्जाच्या कंपनीत डायरेक्टर म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.