• Mon. Jan 27th, 2025

अण्णाभाऊ साठे यांनी केलेले समाज प्रबोधन आजही दिशादर्शक -डॉ. भास्कर रणनवरे

ByMirror

Aug 6, 2022

व्याख्यानमाला, स्वच्छता अभियानाने अण्णाभाऊंना अभिवादन

मानवता जन आंदोलन व जय युवा अकॅडमीचा उपक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केलेले समाज प्रबोधन आजही दिशादर्शक आहे. अत्यल्प शिक्षणात तळागाळातील समाजासाठी लेखण्याच्या माध्यमातून समाज जागृतीचे कार्य करून परिवर्तन घडविण्यासाठी उभे आयुष्य त्यांनी खर्ची केले. शाहिरी, साहित्य, कांदबरी लेखन करून समाज सुधारणेचे अतुलनीय कार्य अण्णाभाऊ साठे यांनी केले. त्यांच्या कार्यातून आजच्या पिढीने प्रेरणा घेतली पाहिजे, असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा रुग्णालयाचे सेवानिवृत्त वैद्यकिय अधिकारी डॉ. भास्कर रणनवरे यांनी केले.


मानवता जन आंदोलन व जय युवा अकॅडमीच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त एमआयडीसी शासकीय दूध डेअरी चौक येथे अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी मानवता जन आंदोलनाचे अध्यक्ष विजय पाथरे, जय युवा अकॅडमीचे अध्यक्ष अ‍ॅड. महेश शिंदे, उडान फाऊंडेशनच्या आरती शिंदे, सामाजिक कार्यकर्ते साहेबराव पाचारणे, रजनी ताठे, रमेश अल्हाट, पोपटराव पाथरे, सुनील सकट, नानासाहेब जगताप, राजू रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते.


विजय पाथरे यांनी समाज सुधारकांची जयंती वैचारिक प्रबोधनातून साजरी करणे आवश्यक आहे. समाज परिवर्तनासाठी युवकांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. अ‍ॅड. महेश शिंदे यांनी मानवता जन आंदोलन बेघर कुटुंबांसाठी शासन दरबारी गेल्या दहा वर्षापासून लढा देऊन पाठपुरावा करीत आहे. प्रत्येक बेघर कुटुंबाला हक्काचा निवारा मिळावा म्हणून, प्रयत्नशील आहे. अशा उपक्रमातून वैचारिक देवाण-घेवाण होत असल्याचे त्यांनी सांगितले.


यावेळी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. दिवंगत सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. भानुदास होले यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितु पाटोळे यांनी केले. आभार आरती शिंदे यांनी मानले. जयंती उत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या व्याख्यानमाला व स्वच्छता अभियान उपक्रमासाठी बाळासाहेब कांबळे, जितु पाटोळे, जॉन पोटोळे, रशीद शेख, उमेश साठे, सागर पाथरे, अमोल वाळुंज, अविनाश कांबळे, अमोल कांबळे, किरण डोंगरे, पांडुरंग सानप, किरण पाथरे, शुभम पाथरे, बंटी पाटोळे, सुशांत पाथरे, किशोर कांबळे, प्रेम पाथरे, रोहिदास खवळे, विशाल वाकोडे, अभिषेक खवळे, सुमित वाकोडे, कुमार वाकोडे, दिपक पाखरे, ऋषिकेश आढाव, पंकज पाटोळे, अर्चनाताई शिंदे, रेश्मा पाथरे, राणी पाथरे, सोनाली पाथरे यांनी परिश्रम घेतले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *