बाल भिक्षुंची भिमवंदना
ज्याने आंबेडकरी विचार स्वीकारला तो मानसिक गुलामगिरीच्या जोकडातून मुक्त होतो -संजय कांबळे
अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्केटयार्ड चौकातील त्यांच्या पुतळ्यास तथागत बुद्धिस्ट सोसायटी (इंडिया) च्या वतीने अभिवादन करण्यात आले. बाल भिक्षु संघाच्या सदस्यांनी भिमवंदनेने बाबासाहेबांना आदरांजली वाहिली.
तथागत बुद्धिस्ट सोसायटीचे अध्यक्ष संजय कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले. यावेळी विजितकुमार ठोंबे, बाळासाहेब कांबळे, सुनिल पंडित, संजय भिंगारदिवे, जिवन कांबळे, बबन दिवे, नवीन भिंगारदिवे, प्रकाश कांबळे, दत्ता नेमाने, सागर चाबुकस्वार, बाळासाहेब धीवर आदी उपस्थित होते.
संजय कांबळे म्हणाले की, हजारो वर्षापासून विषमता आणि अंधारात असलेल्या वंचित समाजाला बाबासाहेबांनी जागृक करुन त्यांचा उध्दार केला. ज्याने आंबेडकरी विचार स्वीकारला तो मानसिक गुलामगिरीच्या जोकडातून मुक्त होतो. यासाठी मानसिक गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी आंबेडकरी विचार दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.