उत्तम आरोग्यासाठी पौष्टिक व सकस आहाराच्या रेसीपींचे मार्गदर्शन
अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने घेण्यात आलेल्या पाककला प्रशिक्षण वर्गाला महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. यामध्ये संगिता चंगेडिया यांनी उत्तम आरोग्यासाठी आहार देखील महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट करीत, पौष्टिक व सकस आहाराच्या रेसीपी सांगितल्या. पावभाजी ढोकला, बेसन फ्रँकी आदींसह विविध स्वादिष्ट खाद्य पदार्थ प्रात्यक्षिकासह बनवून दाखविले.
या कार्यक्रमासाठी ग्रुपच्या सचिव ज्योती कानडे, अध्यक्षा अलकाताई मुंदडा, उपाध्यक्षा सविता गांधी, उज्वला बोगावत, शोभा पोखरणा, शशीकला झरेकर, स्वप्ना शिंगवी, उषा गुगळे, शकुंतला जाधव आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
चंगेडिया यांनी बदलत्या ऋतूनुसार आहारात देखील बदल आवश्यक आहे. ऋतूनुसार योग्य आहार घेतल्यास आरोग्यावर दुष्परिणाम न होता, उत्तम आरोग्य टिकून राहत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात अलकाताई मुंदडा यांनी मागील पंचवीस वर्षापासून प्रयास ग्रुपच्या माध्यमातून महिलांच्या सर्वांगीन विकासासाठी कार्य सुरु आहे. तसेच महिला एकत्र येऊन सामाजिक कार्य देखील करत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी महिलांच्या विविध बौध्दिक स्पर्धा पार पडल्या. यामधील विजेत्या महिलांना ज्योती कानडे यांच्या वतीने बक्षिसे देण्यात आली. ग्रुपच्या अध्यक्षा अलकाताई मुंदडा यांना नारी शक्ती पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा रेखा फिरोदिया यांनी ग्रुपच्या वतीने सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्ना शिंगवी यांनी केले. आभार सविता गांधी यांनी मानले.