मतदानासाठी समाजबांधवांचा उत्साह, 81 टक्के मतदान
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर शहर नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्टची निवडणुक नुकतीच शांततेत पार पडली. नागोरी मुस्लिम मिसगर समाजाने तब्बल 16 वर्षानंतर एकत्र येऊन निवडणुक प्रक्रिया पार पडली. मतदानासाठी मोठा उत्साह दिसून आला, तब्बल 81 टक्के पर्यंत मतदान झाले.
रविवारी झालेल्या या मतदान प्रक्रियेसाठी अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मतदान केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता. काही मतदार मतदानासाठी आले मात्र त्यांचे नाव मतदार यादीत आले नसल्याने त्यांना मतदान करता आले नाही. एका गटातील काही मोजक्या व्यक्तींनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र समाजाने हा डाव हाणून पाडत उत्स्फुर्तपणे मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवून लोकशाही पध्दतीने आपले उमेदवार निवडून दिले.
या निवडणुकीमध्ये एकूण 13 उमेदवार होते. अहमदनगर शहरातील 9 उमेदवार निवडणूक मध्ये उभे होते तर नागपूर मधून परवेज खान उमरखान, मुंबई मधून समीर जुबेर तांबटकर, नाशिक मधून आसिफ अब्दुल रहेमान व पुण्यातून इफ्तिखार इस्माइल खान हे जिल्ह्याबाहेरील उमेदवार बिनविरोध निवडून आले.
झालेल्या निवडणुकीत अहमदनगर शहरातून रेहान काझी (मते 279) एक नंबरच्या मतांनी विजयी झाले. तसेच इनाम उल्ला खान (267), खान ईफतेखार अकील (238), वाजिद खान (198) मुबीन तांबटकर (184) हे पाच उमेदवार मताधिक्याने विजयी झालेले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड. विमल खेडकर, अॅड. भावना पलीकुंडवार, अॅड. मीना शुक्रे, अॅड. धनलक्ष्मी नायडू यांनी काम पाहिले. तसेच निवडणूक समितीचे अध्यक्ष हाजी निसार पवार बाटलीवाला, बशीर काझी, जावेद सईद खान, डॉ.आयुब खान यांनी निवडणूक समितीच्या कामकाज पाहिले. निवडून आलेल्या उमेदवारांचे सर्व समाजातून अभिनंदन होत आहे.