वासन टोयोटा शोरुममध्ये हाईराइडरच्या अनावरणासाठी कार प्रेमींना उपस्थित राहण्याचे आवाहन
ऑनलाईन बुकिंग सुरु
अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतातील प्रतिष्ठित एसयूव्हीच्या यादीत आता टोयोटाच्या द अर्बन क्रुझर हाईराइडरचा समावेश झाला असून, ही एसयूव्ही फर्स्ट इन सेगमेंट वैशिष्ट्यासह बाजारपेठेत दाखल होत आहे. या कारची बुकिंग सुरु झाली असून, या कारचे अनावरण केडगाव एमआयडीसी येथील वासन टोयोटा शोरुममध्ये सोमवारी (दि.5 सप्टेंबर) होणार असल्याची माहिती शोरुमचे जनक आहुजा यांनी दिली. सेल्फ चार्जिंग स्ट्राँग हायब्रीड इलेक्ट्रिक पॉवरट्रेनचा समावेश असलेल्या या कारच्या बुकिंगला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, ही कार पहाण्यासाठी शोरुमला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
द अर्बन क्रुझर हाईराइडरचे जागतिक स्तरावर कौतुक झाले असून, सेल्फ चार्जिंग स्ट्राँग हायब्रीड इलेक्ट्रिक व्हेईकलचा भारतातील मास सेगमेंटमध्ये प्रवेश झाला आहे. हाईराइडर एसयुव्ही निओ ड्राईव्ह आणि सेल्फ चार्जिंग स्ट्राँग हायब्रीड इलेक्ट्रिक पॉवरट्रेन या दोन पावर ट्रेनमध्ये उपलब्ध आहे. ही एसयूव्ही 7 आकर्षक मोनोटोन रंगसंगतीत आणि बाह्य बाजूला 4 दुहेरी टोन रंगसंगतीत उपलब्ध करण्यात आली आहे. मोनोटोन रंगांमध्ये केव्ह ब्लॅक, स्पोर्टीन रेड, स्पिडी ब्लू, एन्टिसिंग सिल्वर, गेमिंग ग्रे आणि मिडनाईट ब्लॅकचा समावेश आहे. तर दुहेरी टोन रंगांमध्ये ब्लॅक रुफसह कॅफे व्हाईट, स्पोर्टिन रेड, एन्टिसिंग सिल्व्हर आणि स्पिडी ब्लूचा समावेश आहे.
ग्राहकांना 25 हजार रुपये भरुन द अर्बन क्रुझर हाईराइडरची बुकिंग करता येणार आहे. www.toyotabharat.com./onlinebooking/ या संकेतस्थळावर ऑनलाईन बुकिंग करता येणार आहे. किंवा वासन टोयोटा शोरुमला भेट देऊन ही कार पहाण्याची संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती अनिश आहुजा यांनी दिली. अधिक माहितीसाठी ग्राहकांनी www.toyotabharat.com यावर लॉगिन करण्याचे सांगण्यात आले आहे.
द अर्बन क्रुझर हाईराइडरचे ठळक वैशिष्टे
पेनोरामिक सनरुफ, हेड अप डिस्प्ले आणि 360 अंश कॅमेराने सुसज्ज असलेल्या एसयुव्हीत वाहन चालविण्याचा अप्रतिम अनुभव मिळणार आहे. आय कनेक्ट, 9 इंची नवीन स्मार्ट प्ले कास्ट आणि वायरलेस चार्जिंगसह स्मार्ट डिव्हाईस इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स, 6 एअर बॅग, अँटिलॉक ब्रेकिंग सिस्टीम, टीपीएमएस, क्रूझ कंट्रोल, फ्रंटसीट पिटी/एफएल, ईबीडीसह एबीएस, व्हेईकल स्टॅबिलीटी कंट्रोल अॅडव्हान्स बॉडी स्ट्रक्चर, हिल होल्ड कंट्रोल, रिअर 3 पॉइंट सीटबेल्ट आणि ऑल व्हील डिस्क ब्रेक, स्मार्टवॉच कनेक्टिव्हिटी आणि प्रगत आवाज नियंत्रण, रिमोट व्हेइकल इग्निशन स्टार्ट/स्टॉप, रिमोट एसी कंट्रोल, चोरीला गेलेले वाहन ट्रॅकिंग करण्याची सुविधा, रिमोट मोबिलायझरने सुसज्ज.