• Sun. Feb 22nd, 2026

हरदिन मॉर्निंग ग्रुपची बालभवनच्या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी सतरंज्या भेट

ByMirror

Sep 13, 2022

तर गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

पाऊसाळा व थंडीत बसण्यासाठी विद्यार्थ्यांची होणार सोय

अहमदनगर (प्रतिनिधी)- पर्यावरण संवर्धन, आरोग्य व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आनण्यासाठी कार्यरत असलेल्या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भिंगार येथील स्नेहालय संचलित बालभवनच्या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी सतरंज्या व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.


बालभवनमध्ये विद्यार्थ्यांसह झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, रमेश वराडे, सचिन चोपडा, दीपक बडदे, सर्वेश सपकाळ, मेजर दिलीप ठोकळ, सुमित मेहतानी, प्रफुल्ल मुळे, अभिजीत सपकाळ, अशोक पराते, संतोष हजारे, अशोक लोंढे, प्रा. एकनाथ जगताप, सुधाकर चिदंबर, सिताराम परदेशी, दिलीप बोंदर्डे, माजिद शेख, रामनाथ गर्जे, अब्बास शेख, किरण फुलारी, सूर्यकांत कटोरे, कुमार धतुरे, सचिन कस्तुरे, मनोहर दरवडे, बालभवनच्या निलोफर शेख, गुलनाज सय्यद, सुप्रिया सदलापूरकर, अंजूम शेख, शीला साळवे व ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.


संजय सपकाळ म्हणाले की, आजचे विद्यार्थी उद्याचे उज्वल भवितव्य असून, दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी प्रत्येकाने हातभार लावण्याची गरज आहे. सर्व घटकातील मुले शिकल्यास समाजाची प्रगती होणार आहे. थंडी व पावसात विद्यार्थ्यांना फरशीवर बसणे अशक्य असून, त्यांना उत्तमप्रकारच्या सतरंज्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हरदिन मॉर्निंग ग्रुप प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.


प्रास्ताविकात निलोफर शेख यांनी झोपडपट्टीतील मुलांना शिक्षणाच्या माध्यमातून घडविण्यासाठी स्नेहालय संचलित भालभवन कार्यरत आहे. दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या संस्काक्षम शिक्षणासह आरोग्याकडे लक्ष देऊन त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचे काम केले जात असल्याचे सांगितले. प्रा. एकनाथ जगताप यांनी झोपडपट्टीतील मुलांचा जन्मापासून संघर्ष कायम सुरू असतो, मात्र मोठ्या धैर्याने ते न डगमगता आलेल्या समस्यांवर मात करुन आपले ध्येये गाठत असल्याचे स्पष्ट करुन, विद्यार्थ्यांना परिस्थिती बदलण्यासाठी उच्च शिक्षित होण्याचे त्यांनी आवाहन केले. आभार गुलनाज सय्यद यांनी मानले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *