• Mon. Dec 1st, 2025

सीना नदीची लवकरच हद्द निश्‍चित होणार

ByMirror

Jun 16, 2023

अहमदनगर (प्रतिनिधी)- सीना नदीची हद्द निश्‍चितीसाठी अत्याधुनिक यंत्रणेद्वारे मोजणी करण्यात आली असून, याच मोजणीनुसार अभिलेखाची पडताळणी करून लवकरच सीना नदीची हद्द ठरवली जाणार आहे.
शहरात अतिवृष्टीने निर्माण होणारी पूरजन्य परिस्थिती व भविष्यातील संकट टाळण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सीना नदीची हद्द निश्‍चित करण्यासाठी भूमी अभिलेख विभाग व मनपा प्रशासन यांच्या संयुक्त कार्यवाहीनुसार नदीच्या लगत असणारे सर्व्हे नंबरची अत्याधुनिक यंत्रणेद्वारे मोजणी करण्यात आली आहे. यानुसार लवकरच सीना नदीची हद्द ठरवली जाणार आहे. सदर मोजणी डावरे व ज्योती तिवारी यांनी काम पाहिले.

मोजणी मापन हे आधुनिक अशा रोवरचा वापर करुन करण्यात आली आहे. संबंधित यंत्रणेला रेखांश, अक्षांश नुसार सीना नदीची हद्द कायम करून दिली जाणार आहे.

सीना नदीची हद्द लवकरच निश्‍चित होणार असून, ती कायमस्वरूपी राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *