• Thu. Oct 16th, 2025

शहरातील धोकादायक लोखंडी कमानी हटवा

ByMirror

Jul 14, 2023

सार्वजनिक ठिकाणी व उद्यानात स्वच्छता राहण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी

राष्ट्रवादी युवकच्या शिष्टमंडळाचे आयुक्तांना निवेदन

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील धोकादायक लोखंडी कमान हटवून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सार्वजनिक ठिकाणी व उद्यानात स्वच्छता राहण्याबाबत उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी युवकच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर, केतन ढवण, ओमकार म्हसे, मंगेश शिंदे, आशुतोष पानमळकर, सुमित कुलकर्णी, निहाल जाधव, श्रावण जाधव, गौरव हरबा, पंकज शेंडगे, किशोर थोरात आदींसह युवा कार्यकर्ते उपस्थित होते.


शहरात प्रमुख रस्त्यावर विविध ठिकाणी मोठमोठ्या लोखंडी कमानी कायमस्वरूपी उभ्या करण्यात आलेल्या आहेत. सदर कमानी जवळपास जुन्या निकृष्ट झालेले आहेत. त्यामुळे भविष्यात वादळी वारा व पावसामुळे पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठा अपघात होवून जीवितहानी होऊ शकते. या कमानीवर सुरु असलेल्या जाहिरातबाजीमुळे शहर देखील विद्रूप होत चालले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


तर मनपाकडे असलेले अपुरे मनुष्यबळ आणि वाहनांची कमतरता यामुळे शहरातील बहुतांश भागातील उद्यान, वसाहती मधील झाडापासून होणारा कचरा तसेच काही कारणास्तव होणारी झाडांची पडझड उचलली जात नाही. त्यामुळे या झाडांच्या पालापाचोलामुळे अडचणी निर्माण होत आहे. शहरातील उद्यान व मोकळ्या जागेत वाढत्या अस्वच्छतेमुळे नागरिकांना तेथे मोकळेपणाने वावरता येत नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे.


नागरिकांच्या सुरक्षितता व आरोग्या दृष्टीकोनाने शहरातील धोकादायक लोखंडी कमान हटवावे, उद्यान व सार्वजनिक परिसरातील झाडांचा कचरा उचलण्यासाठी व स्वच्छता राखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *