• Sat. Mar 15th, 2025

शहर राष्ट्रवादीच्या कार्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून कौतुक

ByMirror

Sep 19, 2022

आढावा बैठकीला सर्व पदाधिकार्‍यांची हजेरी

शहर जिल्हाध्यक्ष प्रा. विधाते यांनी कार्याचा अहवाल प्रदेशाध्यक्षांकडे केला सुपुर्द

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील राष्ट्रवादी भवन येथे रविवारी संध्याकाळी उशीरा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक पार पडली. आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनी प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्याकडे केलेल्या कामाचा अहवाल सादर केला.


प्रा. विधाते यांनी शहर विधानसभा मतदार संघात आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून सुरु असलेली विकासकामांची माहिती देऊन, महापालिकेत राष्ट्रवादीचे उपमहापौर गणेश भोसले व नगरसेवकांच्या माध्यमातून नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यात येत आहे. काही अडीअडचणी न सुटल्यास नागरिक आमदार जगताप यांच्या संपर्क कार्यालयात अडचणी घेऊन आल्यास त्याचा निपटारा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.


तर राष्ट्रवादीने संपूर्ण महाराष्ट्रात सुरु केलेल्या एक तास राष्ट्रवादीसाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी या उपक्रमांतर्गत महिन्याच्या दर शनिवारी प्रभागनिहाय बैठका होत असून, याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर नगरसेवकांच्या सहकार्यातून नागरिक पक्षाशी जोडले जात आहे. शहरात एकूण 8 प्रभागात या बैठका झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सभासद नोंदणीसाठी शहराला 500 सभासद पुस्तके देण्यात आले होते, त्यापैकी 364 सभासद पुस्तके नोंदणी करून त्याचा अहवाल प्रदेशाध्यक्षांकडे विधाते यांनी सुपुर्द केला.


प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी शहराध्यक्षांनी सादर केलेल्या शिस्तबद्ध अहवालाचे कौतुककरुन महाराष्ट्रात प्रथमच अशा पद्धतीने सुंदर काम पहावयास मिळाल्याचे सांगितले. तर प्रदेशाध्यक्षांनी सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकारणी सदस्यांची त्यांनी हजेरी घेऊन मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित असल्याने समाधान व्यक्त केले. शहराच्या दृष्टीकोनाने महापालिकेत सध्याचे पक्षीय बलाबल याची माहिती घेऊन दोन वर्षात नंतर होणार्‍या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या अधिक वाढवून पक्ष बळकट करण्याबाबत त्यांनी सूचना केल्या. राष्ट्रवादी सेलचे पदाधिकारी व कार्यकारणी सदस्यांनी विविध विषयावर आपल्या भावना व्यक्त केल्या. केतन क्षीरसागर यांची युवक शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.


या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, महिला निरीक्षक वैशालीताई नागवडे, अशोक बाबर, अंबादास गारुडकर, अभिजीत खोसे, सुरेश बनसोडे, अमित खामकर, रेश्मा आठरे, वैभव ढाकणे, साहेबान जहागीरदार, साधना बोरुडे, अंजली आव्हाड, योगेश नेमाने, भरत गारुडकर, संजय सपकाळ, अनंतराव गारदे, विनीत पाऊलबुद्धे, संभाजी पवार, अरविंद शिंदे, श्रेणिक शिंगवी, प्रकाश भागानगरे, दिलदारसिंग बीर, निलेश इंगळे, कुमार नवले, फारूक रंगरेज, सोपान कदम, सतीश ढवण, भाऊसाहेब इथापे, सोमनाथ रोकडे, भगवान काटे, अ‍ॅड. मंगेश सोले, मारुती पवार, दीपक खेडकर, विशाल बेलपवार, संजय लोखंडे, लकी खूपचंदानी, महेश गोंडाळ, अ‍ॅड. अजीज इनामदार, अक्षय घोरपडे, मोहन गाडे, उमेश धोंडे, मळू गाडळकर, मोहन गुंजाळ, किसन बेदमुथा, सनी शिंदे, अक्षय बोरुडे, सोनू घेबुड आदींसह राष्ट्रवादी सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकारणी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *