घरातील सामानची पडझड
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्याच्या विविध ठिकाणी रविवारी (दि.4 जून) दुपारी वादळी वार्यासह झालेल्या पाऊसाने अनेकांचे नुकसान झाले. नगर-कल्याण महामार्गावरील धोत्रे बुद्रुक (ता. पारनेर) येथील सामाजिक कार्यकर्ते अरुण रोडे यांच्या घराचे नुकसान झाले.
रोडे राहत असलेल्या घराच्या ठिकाणी नेटच्या जाळ्या उडून गेल्या, तर पत्रे देखील विस्कटले. जोरदार वार्यामुळे घरातील सामानची पडझड होऊन मोठे नुकसान झाले. रोडे हे अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष असून, विविध प्रश्नावर व भ्रष्टाचार विरोधात त्यांचा लढा सुरु असतो. या वादळी वार्याच्या पाऊसाचा फटका त्यांना बसला.