घर घर लंगर सेवा, लायन्स क्लब ऑफ अहमदनगर व आय लव्ह नगरचा सामाजिक उपक्रम
सायकलपटू जस्मितसिंह वधवा यांच्या काश्मीर ते कन्याकुमारी सायकल राईडच्या निधीतून राबविला सायकल बँक उपक्रम
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- घर घर लंगर सेवा, लायन्स क्लब ऑफ अहमदनगर व आय लव्ह नगरच्या वतीने लांबून शाळेत पायी जाणाऱ्या शहर व शहरालगत असलेल्या 17 शाळांमधील 111 गरजू मुलींना सायकलीचे वाटप करण्यात आले. गुरुद्वारा भाई दयासिंहजी गोविंदपूरा येथे सायकल बँक या सामाजिक उपक्रमातंर्गत सायकल वितरणाचा सोहळा पार पडला. शहरातील सायकलपटू जस्मितसिंह वधवा यांनी केलेल्या काश्मीर ते कन्याकुमारी सायकल राईड दरम्यान शालेय शिक्षण घेणाऱ्या गरजू मुलींच्या सायकलसाठी निधी जमा करण्यात आला होता. जमवलेला निधी, विविध सामाजिक संघटना व मित्र परिवाराच्या आर्थिक सहयोगातून सायकल बँकचा प्रकल्प राबविण्यात आला.
अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे व शिर्डीचे विभागीय पोलीस उपाअधीक्षक संदीप मिटके यांच्या हस्ते शालेय मुलींना या सायकलीचे वितरण करण्यात आले. यावेळी बेल्जियम येथून आलेल्या लायन्सच्या पाहुण्या डेजॉकहिर मारथे, अहमदनगर सायकलिंग असोसिएशनचे चंद्रशेखर मुळे, श्री राधाकृष्ण मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राकेश गुप्ता, लायन्स क्लबचे अध्यक्ष धनंजय भंडारे, लंगर सेवेचे जनक आहुजा, हरजितसिंह वधवा, प्रितपालसिंह धुप्पड, डॉ. सिमरनकौर वधवा, आय लव्ह नगरचे कार्तिक नायार, अमित बुरा, लायन्सचे झोन चेअरमन हरिश हरवानी, इनरव्हील व्हिनस क्लबच्या अर्पिता शिंगवी, लिओ क्लबच्या अध्यक्षा आंचल कंत्रोड, सेक्रेड हार्ट कॉन्व्हेन्ट 91 बॅचचे भूषण कर्णावट, 89 बॅचचे डॉ. संजय असनानी आदी उपस्थित होते.

प्रास्ताविकात धनंजय भंडारे म्हणाले की, शालेय मुलींना 111 सायकल देण्याचा उपक्रमामध्ये समाजाचा मोठा हातभार लागला आहे. मुलींच्या शिक्षणला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला असून, लवकरच लायन्स इंटरनॅशनलच्या माध्यमातून 101 मुलींना सायकल वाटपाचा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
जस्मित सिंह वधवा म्हणाले की, सायकल हे जीवनाप्रमाणे आहे. गती कमी केल्यास पडण्याची भीती निर्माण होते, सातत्याने संघर्ष करून एका गतीने पुढे जात राहिल्यास यशाची ध्येय प्राप्ती होत असल्याचे त्यांनी सांगितले. तर काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंतच्या सायकल राईडमध्ये आलेल्या थरारक अनुभव त्यांनी विद्यार्थ्यांपुढे कथन केले.
राकेश गुप्ता यांनी कोरोना काळात लंगर सेवेचे लावलेले रोपट्याचे वटवृक्ष बहरले असून, त्यांच्या सामाजिक कार्याचा अनेकांना आधार मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. सायकलिंग असोसिएशनचे चंद्रशेखर मुळे म्हणाले की, आरोग्यासाठी सायकल चळवळ शहरात सुरु करण्यात आली आहे. याचा चांगला प्रतिसाद मिळत असून, अवयव दानची थिम घेऊन नगरचे सायकलिस्ट जनजागृती करत आहे. मुलींच्या शिक्षणासाठी राबविण्यात आलेला सायकल वाटपचा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
बेल्जियम येथून आलेल्या लायन्सच्या पाहुण्या डेजॉकहिर मारथे यांनी मुलींना शिक्षणासाठी शुभेच्छा देऊन स्वावलंबी होण्याचा संदेश दिला. हरजितसिंह वधवा यांनी गुरू अर्जुन सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने इरशाळवाडी (जि. रायगड) येथील भूस्खलन दुर्घटनेत नुकसान झालेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना सायकल आणि शैक्षणिक साहित्य देण्याची घोषणा केली.
देवेंद्रसिंह वधवा लिखित सच्चाई या पुस्तकाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. तर जगातील सर्वात जुनी व अवघड असलेली दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड्स मॅरेथॉन पूर्ण करणारे नगरचे रनर्स जगदीप मक्कर, गौतम जायभय, योगेश खरपुडे, विलास भोजने यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. गुरुद्वारा येथील गुरभेजसिंह बाबाजी यांनी प्रार्थना करुन सायकल वाटप उपक्रमाचे प्रारंभ करण्यात आले. पाहुण्यांचा परिचय सिमरनकौर वधवा यांनी करुन दिला. स्वागत जनक आहुजा यांनी केले. आभार सतीश गंभीर यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत मुनोत, मनोज मदान, कैलाश नवलानी, दलजीतसिंह वधवा, राजा नारंग, राजू जग्गी, राहुल बजाज, राजेश कुकरेजा, करण धुप्पड, कबीर धुप्पड, सनी वधवा, सिमरजितसिंह वधवा, विपुल शहा, बलजितसिंह वधवा, बलजितसिंह बिलरा, दामोदर माखिजा, प्रदीप धुप्पड, चमनलाल कुमार, देवेंद्रसिंह वधवा, मनीषकौर वधवा, प्रणिता भंडारी, प्रिया मुनोत, सहेजकौर वधवा, कोमल वधवा, आनंद बोरा, नितीन मुनोत, पुरुषोत्तम झंवर, दिलीप कुलकर्णी, राजवीरसिंह संधू, जव्हार नगरवाला, नितीन पाठक, प्रीतम भागवानी, अक्षय भळगट, केतन बलदोटा, दिलीप कुलकर्णी, प्राची पवार, अनिश आहुजा, शिबू छेत्री, दलजितसिंह खानिजो, सुरजीतकौर खनिजो, हरमनकौर वधवा, अरमान खंडेलवाल, प्रीत कंत्रोड यांनी परिश्रम घेतले.
काश्मीर ते कन्याकुमारी ही 3 हजार 700 कि.मी. ची राईड पूर्ण करणारे नगरचे सायकलपटू जस्मितसिंह वधवा पुन्हा ऑगस्टमध्ये पॅरीस येथील सायकल राईडमध्ये सहभागी होणार आहे. या राईडमध्ये सहभागी होणारे ते जिल्ह्यातील पहिले सायकलपटू ठरणार आहे.