अण्णाभाऊंना मरणोत्तर भारतरत्न द्यावे व मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- लहुजी शक्ती सेनेच्या वतीने शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 102 वी जयंती साजरी करुन अण्णाभाऊंना मरणोत्तर भारतरत्न द्यावे व मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळण्याची मागणी करण्यात आली.
सिध्दार्थनगर येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी संपर्कप्रमुख जयवंत गायकवाड, जिल्हा संघटक लखन साळवे, शहर संपर्क प्रमुख संतोष उमाप, केडगाव शहराध्यक्ष अभिजीत सकट, जिल्हा युवक अध्यक्ष उत्तम रोकडे, महेश शिंदे, मंगेश शिंदे, महेश किरण, अरुण बोरुडे, राजाराम काळे आदी उपस्थित होते.
सुनिल शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रात अग्रगण्य कार्य केले आहे. दीन, दलित व दुर्बल घटकांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी कार्य केले. त्यांच्यामध्ये जागृती निर्माण केली. त्यांना भारतरत्न मिळावे ही समस्त समाजाची मागणी आहे. मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र आरक्षण मिळण्यासाठी व अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न मिळण्यासाठी लहुजी शक्ती सेना सातत्याने केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करीत असल्याचे सांगितले.
