राज्यस्तरीय शासक बनो, कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीरात राज्यातील प्रमुख पदाधिकारी करणार मार्गदर्शन
शहरातडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्याबाबत केली जाणार चर्चा
अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन समाज पार्टीच्या वतीने मंगळवारी (दि. 20 सप्टेंबर) शहरात कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. टिळक रोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात राज्यस्तरीय शासक बनो, कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीरात राज्यातील प्रमुख पदाधिकार्यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा होणार असल्याची माहिती बसपाचे शहराध्यक्ष संतोष जाधव यांनी दिली.
अहमदनगर जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांना येणार्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करून पक्षाची ध्येय धोरणे, समाजाप्रती असलेली कर्तव्य, काम करण्याची पद्धत, न्यायासाठी संघर्ष, कायदा, मतदान प्रक्रिया आदी बाबत मार्गदर्शन करून उपस्थितांचे मनोबल वाढविण्यात येणार आहे. तसेच शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्याबाबत चर्चा केली जाणार आहे. या मेळाव्यासाठी महाराष्ट्र राज्य प्रभारी मा.खा. अशोक सिद्धार्थ, महाराष्ट्र राज्य प्रभारी प्रमोद रैना, महाराष्ट्र राज्य प्रभारी नितीन सिंग जाटव, प्रदेशाध्यक्ष अॅड. संदीप ताजणे, महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव बाळासाहेब अवारे आदी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यकर्ता मेळाव्यास जिल्ह्यातील सर्व आजी-माजी पदाधिकार्यांनी व सर्व बहुजनांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन शहराध्यक्ष संतोष जाधव यांनी केले आहे. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रदेश सचिव बाळासाहेब आवारे, जिल्हा प्रभारी संजय डहाणे, शहर उपाध्यक्ष सिद्धार्थ पाटोळे, शहर महासचिव अतुल जाधव, शहर सचिव नंदू भिंगारदिवे, शहर कोषाध्यक्ष दीपक पवार परिश्रम घेत आहे.
![](https://mirrornews24.in/wp-content/uploads/2022/08/Stella-1-August-2.jpeg)