• Mon. Dec 1st, 2025

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण

ByMirror

Jun 14, 2023

निबंध, चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

लहान वयातच विद्यार्थी स्पर्धेत टिकले तर भविष्यात चमकतील -सीए शंकर अंदानी

अहमदनगर (प्रतिनिधी)- लहान वयातच विद्यार्थी स्पर्धेत टिकले तर भविष्यात चमकतील. विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी त्यांना विविध स्पर्धेत उतरविण्याची गरज आहे. यासाठी पालकांचे प्रोत्साहन आवश्यक असल्याचे प्रतिपादन कर सल्लागार व लेखापरीक्षक सीए शंकर अंदानी यांनी केले.


पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनानिमित्त समृद्धी वुमन मल्टीपर्पज सोसायटी व किड्स जी प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण प्रसंगी सीए अंदानी बोलत होते. यावेळी नागरदेवळेचे सरपंच राम पानमळकर, शाळेच्या संचालिका सविता राम पानमळकर, समृद्धी वुमन मल्टीपर्पज सोसायटीच्या अध्यक्षा स्वाती प्रकाश डोमकावळे, संस्थेचे सचिव प्रकाश डोमकावळे, शाळेच्या मुख्याध्यापिका आरती गारदे आदींसह शालेय शिक्षक होते.


पुढे बोलताना सीए अंदानी म्हणाले की, मोबाईलमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास खुंटला आहे. त्यांचा शारीरिक विकास खुंटून, कला-गुण विकसीत होण्यास देखील बाधा निर्माण होत आहे. विद्यार्थ्यांना फक्त अभ्यासात न गुंतविता त्यांच्या सर्वांगीन विकासासाठी मैदानावर घेऊन जाण्याचे आवाहन त्यांनी केले.
सरपंच राम पानमळकर यांनी विविध स्पर्धेतील पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपक्रमासाठी व शाळेला सोयी-सुविधा पुरविण्यासाठी नेहमीच सहकार्य राहणार असल्याचे सांगितले.


पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या निबंध, चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तर तर विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने शैक्षणिक करियर मार्गदर्शनवर व्याख्यान घेण्यात आले. यामध्ये तज्ञांनी विविध स्पर्धा परीक्षांची माहिती दिली. पालकांनी घेण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक करुन आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *