डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनचे उपजिल्हाप्रमुख शेळके यांचे महामंडळाच्या व्यवस्थापकांना निवेदन
अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य व केंद्र शासनाच्या निर्णयानुसार औरंगाबाद जिल्ह्याचे नामांतर छत्रपती संभाजीनगर झाले असताना राज्य परिवहन महामंडळाच्या अहमदनगर कार्यक्षेत्रातील बस, बस स्थानक व बस डेपो मध्ये नामांतराची अंमलबजावणी करण्याची मागणी डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन व मुख्यमंत्री वैद्यकिय कक्ष सहायता निधीचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत (काका) शेळके यांनी राज्य परिवहन महामंडळ अहमदनगरचे व्यवस्थापक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

राज्य व केंद्र शासनाच्या निर्णयानुसार औरंगाबाद जिल्ह्याचे नामंतर छत्रपती संभाजीनगर करण्यात आले आहे. परंतु अहमदनगर जिल्ह्यातील बर्याचशा बस, बस स्थानक, बस डेपो तथा महामंडळाच्या नाव फलकावर छत्रपती संभाजीनगर या नवीन नावाऐवजी जुन्याच नावाचा उल्लेख दिसत आहे.
त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रमावस्था निर्माण होत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. तातडीने नामांतराबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील बस, बस स्थानक व बस डेपो मध्ये नामांतराची अंमलबजावणी करुन औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख करण्याची मागणी शेळके यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या अहमदनगर विभागाकडे केली आहे.
