अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व सावता महाराज ग्रुपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, भाऊसाहेब जाधव, लक्ष्मण चौरे, साहेबराव बोडखे, ऋषीकेश जाधव, दिपक चौरे, सुभाष खळदकर, सुखदेव जाधव, सुशांत जाधव, अनिल आनंदकर, युवा मंडळाचे संदिप डोंगरे, भरत बोडखे आदी उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, अष्टप्रधान मंडळाची स्थापना करुन, आदर्शवत राज्यकारभाराची संकल्पना अवघ्या जगाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली. युक्ती, शक्ती व शिस्तीच्या माध्यमातून त्यांनी रयतेचे स्वराज्य स्थापन केले. स्वदेश निष्ठा, प्रेम, सर्वधर्म समभाव व सहिष्णुवृत्तीच्या आधारावर शिवाजी महाराज अजरामर झाले. या महापुरुषांचे विचार व कार्य आज देखील दीपस्तंभाप्रमाणे दिशादर्शक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.