• Thu. Mar 12th, 2026

निमगाव वाघात शालेय विद्यार्थ्यांचा फटाकेमुक्तीचा संकल्प

ByMirror

Oct 19, 2022

फटाके न वाजविण्याची घेतली शपथ

विद्यार्थ्यांनी शिक्षकांना दिली स्वत: बनवलेली शुभेच्छा पत्रं

अहमदनगर (प्रतिनिधी)- पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीकोनातून निमगाव वाघा येथील नवनाथ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी फटाकेमुक्त दिवाळीचा संकल्प व्यक्त करीत, या दिवाळीत फटाके न वाजविण्याची शपथ घेतली. तर विद्यार्थ्यांनी स्वत: बनवलेली शुभेच्छा पत्रं शिक्षकांना देऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.


फटाक्यामुळे निर्माण होणार्‍या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी व पर्यावरणपुरक दिवाळी साजरी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी फटाकेमुक्तीचा निर्धार केला आहे. नवनाथ विद्यालय, स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.


नवनाथ विद्यालयातील शालेय विद्यार्थ्यांना वायू व ध्वनी प्रदुषण टाळण्यासाठी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे व वंचित घटकांना मदत करण्याचे आवाहन या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आले. यावेळी मुख्यध्यापक किसन वाबळे, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे, निळकंठ वाघमारे, चंद्रकांत पवार, उत्तम कांडेकर, शुभांगी धामणे, मंदा साळवे, सुवर्णा जाधव, तुकाराम खळदकर, अशोक डौले, भानुदास लंगोटे, तेजस केदारी, युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदिप डोंगरे, राष्ट्रीय कुस्तीपटू प्रतिभा डोंगरे, वाचनालयाच्या उपाध्यक्षा प्रियंका डोंगरे-ठाणगे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.


किसन वाबळे यांनी फटाक्यांच्या ध्वनी व वायू प्रदुषणामुळे आरोग्यावर व पर्यावरणावर होणारे दुष्परिणामाची माहिती दिली. पै.नाना डोंगरे यांनी दिवाळी हा अंधकार दूर करणारा सण आहे. समाजात पर्यावरणाचा समतोल ढासळला असून, हा अंधकार जागृकतेने दूर होणार असल्याची भावना व्यक्त केली. तर प्रदुषण टाळण्यासाठी फटाकेमुक्तीचा संदेश दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *