चादर मिरवणुकीत धार्मिक ऐक्याचे दर्शन
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील सर्व धर्मियांचे श्रध्दास्थान असलेल्या दावल मलिक बाबांचा संदल-उरुस उत्साहात साजरा करण्यात आला. गावातून पारंपारिक वाद्यांसह चादरची मिरवणुक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत सहभागी झालेल्या हिंदू-मुस्लिम बांधवांनी धार्मिक ऐक्याचे दर्शन घडविले.
गावातून निघालेल्या मिरवणुक प्रसंगी आदम शेख, बशीर शेख, ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, नवाब शेख, हबीब शेख, नामदेव भुसारे, नूरमोहंमद शेख, महेबुब शेख, आसिफ शेख, गुलाब शेख, मोहसीन शेख, बन्सीभाई शेख, अंकुश आतकर, बख्तार सय्यद, नवाझ सय्यद, डॉ. विजय जाधव, कादर शेख, गुलाब शेख, दिलावर शेख, राजमोहंमद शेख, अन्सार शेख, विजय आंग्रे, साहेबराव बोडखे, अतुल फलके, अनिल डोंगरे आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चादर मिरवणुकीचा समारोप दावल मलिक बाबांच्या दर्गाजवळ झाला. यावेळी दर्गावर चादर अर्पण करुन संदल चढविण्यात आला. तर गावाच्या सुख, समृध्दी व शांततेसाठी प्रार्थना करण्यात आली. संदल-उरुस निमित्त दर्गाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. दर्शनासाठी सर्व धर्मिय भाविकांनी गर्दी केली होती. संदलच्या दुसर्या दिवशी सर्व ग्रामस्थ व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी लाभ घेतला.