• Wed. Feb 5th, 2025

नागापूरला रिपाईच्या महिला आघाडी संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

ByMirror

Aug 30, 2022

युवकांसह महिलांचा रिपाईत प्रवेश

धर्मांध शक्ती व हुकूमशाही विरोधात रिपाईचा लढा -डॉ. राजेंद्र गवई

अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकशाही विचाराने रिपाई सर्व समाजाला बरोबर घेऊन कार्य करत असून, धर्मांध शक्ती व हुकूमशाही विरोधात रिपाईचा लढा राहणार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजेंद्र गवई यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन पक्ष कार्य करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


नागापूर येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडी संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी गवई बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संग्राम जगताप, रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा ज्योती पवार, नगरसेवक कुमार वाकळे, संपत बारस्कर, डॉ. सागर बोरुडे, राष्ट्रीय कोषाध्यक्ष रामराव दाभाडे, प्रदेशाध्यक्ष सुबोध वाघमोडे, जिल्हाध्यक्ष सुधाकर रोहम, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुरेश देठे, उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस किशोर वाघमारे, शहर जिल्हा कार्याध्यक्ष दानिश शेख, संतोष पाडळे आदी उपस्थित होते.


पुढे गवई म्हणाले की, दीन-दुबळ्यांच्या हक्कासाठी संघर्ष करणारे छोटे पक्ष चिल्लर असले तरी, बंदा रुपया होण्यासाठी या चिल्लरचीच गरज भासते. यासाठी छोट्या पक्षांना देखील किंमत द्यावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहरात सुशांत म्हस्के यांनी केलेल्या युवकांच्या संघटनचे कौतुक केले.


आमदार संग्राम जगताप म्हणाले की, लोक संघटित होऊन, त्यांचे कामे मार्गी लागण्यासाठी पक्ष कार्यालयाची गरज असते. कार्यालयात लोक कामे घेऊन येतात. त्यांचे प्रश्‍न सुटल्यास ते देखील पक्षाशी जोडले जातात. आरपीआय युवकांना संघटित करुन दुबळ्या घटकांचे प्रश्‍न सोडवित आहे. तर सर्व सामान्यांना आधार देऊन अन्यायाला वाचा फोडण्याचे काम देखील केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रास्ताविकात संपदा म्हस्के यांनी शहरात रिपाईच्या माध्यमातून महिलांचे संघटन करुन त्यांचे प्रश्‍न सोडविण्यात येणार असल्याचे सांगितले. शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के म्हणाले की, अहमदनगर जिल्हा रिपाईचा बालेकिल्ला राहिला आहे. पुन्हा संघटन करुन सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी रिपाई कटिबध्द राहणार आहे. एमआयडीसी, बोल्हेगाव, नागापूर येथील कामगार वर्ग व महिलांची सोय होण्यासाठी व त्यांचे प्रश्‍न तातडीने सुटण्यासाठी या कार्यालयाच्या माध्यमातून कार्य केले जाणार आहे. सामाजिक कार्यासाठी शहराचे आमदार संग्राम जगताप यांचे विशेष सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.


जिल्हाध्यक्ष सुधाकर रोहम यांनी रिपाई समविचारी माणसांबरोबर कार्यकरत आहे. पक्ष, जात, धर्म बाजूला ठेऊन सर्वसामान्यांची प्रश्‍न सोडविण्याच्या उद्देशाने कार्य केले जात आहे. युवकांचा पक्ष शहरात संघटन उत्तमपणे उभारण्यात आले असून, लाचारी नको, हक्काच्या स्थानासाठी आरपीआयचा संघर्ष सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. प्रदेशाध्यक्ष सुबोध वाघमोडे यांनी हुकुमशाही सत्ताधारी विरोधकांना दावणीला बांधण्यासाठी ईडीचा वापर करत आहे. सर्वसामान्यांचे प्रश्‍नांकडे दुर्लक्ष होत असल्याने महागाईने जनता होरपळत असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमासाठी कार्यक्रमासाठी बन्सी घंगाळे, अशोक गायकवाड, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष गुलाम शेख, नईम शेख, संदीप वाघचौरे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अलका बोर्डे, संपदा म्हस्के, विकी प्रबळकर, जमीर इनामदार, निजाम शेख, इमरान शेख, जावेद सय्यद, ओबीसी आघाडीचे अध्यक्ष विजय शिरसाठ, अभिजीत पंडित, अरबाज शेख, ऋषी पाडळे, हुसेन चौधरी, मोहसिन शेख, सचिन शिंदे, विनीत पाडळे, इरफान शेख, अजिन खान, निखिल शिंदे, हर्षल जाधव, आफताब बागवान, संदीप पाटोळे, राहुल गायकवाड, अनिकेत पवार, प्रथमेश पवार, विश्‍वंभर भाकरे, राकेश चक्रनारायण, भीम वाघचौरे, आकाश काळे, सुशील म्हस्के,अलका भाकरे, समृद्धी भाकरे, शोभा मीरपगार, हर्षाली म्हस्के, संगीता पाटोळे, प्रांजली पाडळे आदी उपस्थित होते.

युवकांसह महिलांचा रिपाईत प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजेंद्र गवई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या या कार्यक्रमात शहर व उपनगरातील युवकांसह महिलांनी रिपाईत प्रवेश केला. यामध्ये डॉ. इलियास शेख, डॉ. सोमनाथ सोनवणे, प्रीती कजबे, पूजा साठी, जोगेश्‍वरी भिंगारे, विपुल भोसले, सज्जाद शेख, अजय पंडित, सोफियान काझी, रवी कानडे, सद्दाम शेख, उमेश गायकवाड, आदिल शेख, रोहन कानडे, सोहेल शेख यांनी पक्षात प्रवेश केला असता, त्यांचे स्वागत करुन सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *