जिव्हाळा ग्रुप आयोजित व महावीर ग्रुप प्रायोजित उपक्रम
रंगणार दांडिया व डान्स स्पर्धा
अहमदनगर (प्रतिनिधी)- शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त शहरातील जिव्हाळा ग्रुप आयोजित व महावीर ग्रुप प्रायोजित दांडिया नाईटचे शनिवारी (दि.24 सप्टेंबर) संध्याकाळी टिळकरोड येथील नंदनवन लॉन येथे आयोजन करण्यात आले आहे. या दांडिया नाईटमध्ये सहभागी होण्याचे आवाहन जिव्हाळा ग्रुपच्या अध्यक्षा अल्पना कासवा यांनी केले आहे.
कोरोनाच्या दोन वर्षानंतर यावर्षी नवरात्र मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असून, या पार्श्वभूमीवर दांडिया नाईट व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन नगरसेविका शितल जगताप यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक नरेंद्र फिरोदिया, उपमहापौर गणेश भोसले, नगरसेविका मीनाताई चोपडा, नगरसेवक विपुल शेटीया उपस्थित राहणार आहे. तसेच उद्योजक राजेश भंडारी यांचा विशेष सत्कार यावेळी केला जाणार आहे.
ग्रुपच्या सर्व महिला सदस्यांनी एकत्र येऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये बेस्ट सोलो डान्सर, बेस्ट कपल डान्स, बेस्ट ड्रेसअप, बेस्ट ग्रुप डान्स, बेस्ट किड्स डान्सरचे आकर्षक बक्षिस देण्यात येणार आहे. या दांडिया नाईटचे वैशिष्टये म्हणजे नॉन स्टॉप म्युझिक लाईट, डीजे, एलईडी वॉल स्टेज आणि फूड काउंटर्स राहणार आहे. तसेच दहा भाग्यवान विजेत्यांना कुपनच्या लकी ड्रॉ द्वारे बक्षिसे दिली जाणार आहे. या कार्यक्रमासाठी लक्ष्मी फॅशन्स, चंदुकाका सराफ, कृपाली ब्युटी पार्लर, भारतियम मल्टिस्टेट, बजरंग काशीनाथ गुरव ज्वेलर्स, गजानन हॉस्पिटल, सरस्वती हॉस्पिटल, पोळ क्लासेस, नाऊ अॅण्ड फॉरेवर फोटोग्रॉफी यांचे सहकार्य मिळाले असून, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रुपच्या सदस्या विणा जगताप, सविता काळे, सीमा शेटीया, सुवर्णा डागा, अर्चना बाफना, अर्चना सोलंकी परिश्रम घेत आहे.

