उमंग फाउंडेशनचा उपक्रम
आरोग्य चळवळ ही सामाजिक चळवळ होण्याची गरज -डॉ. संतोष गिर्हे
अहमदनगर (प्रतिनिधी)- दिवाळीनिमित्त उमंग फाउंडेशनच्या वतीने शहरातील यतिमखाना बोर्डिंग स्कूल मधील मुलींची आरोग्य तपासणी करुन मिठाईचे वाटप करण्यात आले. या शिबीरात वस्तीगृहातील विद्यार्थिनींचे हिमोग्लोबीन, मधुमेहसह आरोग्य तपासणी करण्यात आली.

यावेळी उमंग फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संतोष गिर्हे, जिजाऊ फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. धनाजी बनसोडे, उत्कर्ष संस्थेच्या नयना बनसोडे, अॅड. महेश शिंदे, अॅड. प्रणाली भुयार, अॅड. अनिता दिघे, अॅड. पुष्पा जेजुरकर, वैशाली कुलकर्णी, रित्विक सोनवणे, बाळासाहेब सोनवणे, सुरेश मोहिते, स्वाती मोहिते, राहुल भडांगे, मेघा भडांगे, पद्मा जहागीरदार, मधुकर जहागीरदार, अण्णा भांडवलकर आदी उपस्थित होते.
डॉ. संतोष गिर्हे म्हणाले की, आरोग्य चळवळ ही सामाजिक चळवळ होण्याची गरज आहे. सदृढ आरोग्यासाठी जागृती महत्त्वाची आहे. वंचित घटकातील विद्यार्थ्यांसह आरोग्यमय दिवाळी साजरी करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. वंचित घटकांना महागाईमुळे आरोग्य सेवा मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत. फाऊंडेशनच्या माध्यमातून गरजूंना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी पुढाकार घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. तर वस्तीगृहातील मुलींचे आरोग्य सदृढ राहण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

डॉ. धनाजी बनसोडे यांनी वेळोवेळी केलेल्या आरोग्य चाचण्या भविष्यातील गंभीर आजारांचा धोका टाळू शकतात. सर्वसामान्यांनी आरोग्य शिबीराचा लाभ घेऊन आपले आरोग्य निरोगी ठेवण्याचे त्यांनी आवाहन केले. शिबीर यशस्वी करण्यासाठी यतिमखाना बोर्डिंग स्कूलचे विश्वस्त शाकिर शेख, हारुन शेख, गुफरान शेख, आयशा शेख, फारुक सय्यद आदी उपस्थित होते.