• Fri. Mar 14th, 2025

तिसर्‍या अपत्याची माहिती लपविणार्‍या त्या शिक्षण संस्थेतील सेवकाला बडतर्फ करण्याची मागणी

ByMirror

Mar 27, 2023

सोमवारी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हा परिषदे समोर उपोषण

दोन मुली असताना मुलाच्या हव्यासापोटी तिसर्‍या अपत्याला जन्म दिल्याचा आरोप

अहमदनगर (प्रतिनिधी)- दोन मुली असताना मुलाच्या हव्यासापोटी 2005 नंतर तिसरे अपत्याला जन्म देऊन, तिसर्‍या मुलाची माहिती शासनापासून लपवणार्‍या देवटाकळी (ता. शेवगाव) येथील एका शिक्षण संस्थेत कार्यरत कर्मचारीला सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या प्रकरणी चौकशी करुन कारवाई न झाल्यास सोमवारी (दि. 3 एप्रिल) जिल्हा परिषदे समोर आमरण उपोषण करण्याच इशारा देण्यात आला आहे.


दहिगावने (ता. शेवगाव) येथील एका नामवंत शिक्षण संस्थेच्या देवटाकळी येथील शाळेत कार्यरत असलेल्या कर्मचारीस दोन मुली आहेत. मुलाच्या हव्यासापोटी सदर कर्मचारी याला 2016 साली मुलगा झाला. सन 2005 नंतर तिसरे आपत्य झाल्यास अशा शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा शासनाचा निर्णय आहे. सदर कर्मचारीने ही माहिती शासनाला कळविलेली नाही. त्यांनी शासनाच्या नियमाची पायमल्ली केली आहे. तिन्ही मुले कुकाणा येथील एका शाळेत शिक्षण घेत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.


28 मार्च 2005 मधील तरतुदीचे शासनाच्या निर्णयाचे उल्लंघन करुन 2005 नंतर तिसरे अपत्य जन्म देणार्‍या सदर सेवकाच्या चौकशीसाठी तात्काळ कागदपत्रे हस्तगत करावी व त्या दोषीला सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *