अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील जे.एस.एस. गुरुकुलचे प्राचार्य आनंद कटारिया यांना लोकमत एक्सलंट टीचर्स अवॉर्ड 2022 नुकताच जाहीर झाला आहे. शनिवारी (दि. 21 मे) सायंकाळी 5 वाजता शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
जे.एस.एस. गुरुकुलच्या वतीने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसह सर्वांगीन विकासासाठी विशेष महत्त्व दिले जाते. शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांची आवड-निवड पाहून त्या दिशेने त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या सुप्तकलागुणांना वाव देण्यात येत आहे. कोरोनामुळे मुलांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी अधिकचे तास घेऊन संपूर्ण अभ्यासक्रम पुर्ण करण्यात आला. विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर पासून ते वक्तृत्व उत्तम होण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. या नाविन्यपुर्ण उपक्रमासाठी प्राचार्य आनंद कटारिया यांचा नेहमीच पुढाकार असतो. या सर्व उपक्रमाची दखल घेऊन कटारिया यांना या वर्षीचा लोकमत एक्सलंट टीचर्स अवॉर्ड जाहीर झाला आहे.