अहमदनगर शहर येथे शिखांचा इतिहास 1650 पासून आहे. छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथील छोटे गाव सातारा येथील धर्मसाल या ऐतिहासिक गुरुद्वारा येथे भाई इंदरवीर सिंग आणि त्यांच्या वडिलांना तेथील गावकर्यांकडून अहमदनगर निवासी भाई जेठासिंग यांचे सन 1670 आणि त्यापूर्वीचे इतिहास गुरुमुखी या पंजाबी भाषेत गावकर्यांकडून प्राप्त झाले आहे. याच बरोबर उदासी संत श्री भगवानदास तसेच नांदेड येथील समाजाच्या लोकांकडे हे ऐतिहासिक कागदे आहेत. भाई जेठासिंग यांना भाई दया सिंग प्रथम प्यारे यांनी भेट म्हणून दिलेली शिरी साहेब (किर्पाण) आज देखील धर्मसाल या गुरुद्वार्यात दर्शनासाठी उपलब्ध आहे. 1 मे बाबा जेठासिंगजी यांचा प्रकाश दिवस निमित्त मिळालेल्या इतिहासाची अहमदनगर शहरातील नागरिकां सोबत या लेख द्वारे प्रस्तुत करत आहोत. या बद्दल इतिहासकारांनी देखील नोंद आणि शोध घ्यावे जेणेकरून पंजाब आणि महाराष्ट्राचे हे नाते किती जुने आहे आणि घट्ट आहे हे देखील लक्ष्यात येते.
जीवनी धन धन बाबा जेठासिंगजी
1 मे 1670 यावर्षी महावीर भगत बाबा जेठासिंगजी यांचा जन्म फुलाजी नरुला आणि माता नेनेजी यांच्या घरी महाराष्ट्राच्या अहमदनगर या शहरात झाले. भाई फुलाजी घोडे- खच्चर याचे मोठे व्यापारी होते, तसेच ते गुरुनानक देवजी यांचे उपासक देखील होते. पंचम पातशाह सद्गुरु श्री गुरु अर्जनदेवजी यांच्याकडून त्यांच्या पूर्वजानी सीखी प्राप्त केली होती. श्री फुलाजी यांनी गुरु रामदासजी यांना आठवण करून आपल्या एक मात्र पुत्र यांच्या नाव जेठालाल ठेवले.

जेठालाल जी लहानपणापासून निरंकारच्या भक्तीमध्ये लिन राहत अन संत महापुरुष व पुरुष यांच्यासोबत सेवा करीत असत. लहान मुलां सोबत खेळण्यात त्यांना कधीच रस नव्हतं तसेच संपन्न परिवारात जन्म झाल्याने त्यांनी उच्च शिक्षा देखील प्राप्त केली. युवावयात देखील त्यांच्या भक्ती भाव आणि त्यागी स्वभाव त्यामुळे व्यापारी पिता फुलाजी हे कायम भविष्याचे चिंतेत असायचे. जवळच्या लोकांनी त्यांना सल्ला दिला की गृहस्थ आणि व्यापाराची जबाबदारी जेठाजीवर टाकली तर त्यांच्या स्वभावावर बदल होईल. फुलाजी यांनी योग्य वधू बघून पवनाजी यांच्यासोबत जेठाजी यांचा विवाह संपन्न केले. लग्नानंतर जेठाजी यांच्या स्वभाव बदलणे ऐवजी पावनाजी देखील जेठाजीच्या रंगात रंगल्या आणि ते देखील भक्तीच्या मार्गावर चालू लागल्या. त्यानंतर पिताजींनी व्यापाराची जबाबदारी त्यांच्यावर निश्चित केली की यामुळे याच्यात काही बदल होईल. एकदा भाई फुलाजी यांनी वीस घोडे आणि दहा माणसं सोबत देऊ त्यांना सांगितलं की हे सगळेच सगळे दौलताबादचे अधिकारी यांना पोहचवायचे आणि तसेच त्यांच्याकडून मोबदल्यात पैसे घेऊन परत येणे, घोडे विकल्याशिवाय परत ना येण्याची ताकीद देखील दिली. बाबा जेठाजी घोडे आणि चाकर घेऊन दौलताबाद कडे निघाले वडिलांनी निघताना आदेश दिले की सुरज सूर्य असतो होण्याच्या आधी तू कुठे थांबायचं नाही आणि सूर्य उदय झालानंतर तुला चालायला सुरुवात करायची कारण वडिलांना शंका होती की हा कुठे जरी रस्त्यात थांबला तर त्या ठिकाणी तो गुरु गोबिंद सिंग यांच्या भक्तीत लीन होऊन जाईल आणि त्याला बाकीच्या गोष्टीचा भान राहणार नाही. त्यावेळेस दौलताबाद कडे जाताना गोदावरी नदी पार करून जावावे लागायचे आणि त्यावेळेस गोदावरी नदीला पूर आलेला होता हे लोकांना माहीत नव्हतं. नदीचे जवळ पोहोचल्यावर सर्व नोकर घाबरले आणि थांबले परंतु घोड्यावर बसलेले भाई जेठाजी हे धन धन दशमेश पिता कलगीदार श्री गुरू गोविंद सिंग यांच्या ध्यानात होते आणि आपल्या वडिलांच्या आदेश पाळत बिना थांबत ते घोड्यावरतीच नदीत उतरले आणि सगळे घोडे त्यांच्या मागे नदीत चालले. सगळे नोकर जोर जोरात ओरडायला लागले आणि त्यांनी घोड्यावरून उद्या मारीत आपले जीव वाचविले. त्यांनी जेठाजी यांना परत येण्यासाठी आवाज दिले, परंतु बाबा जेठासिंगची यांना कोणाचंच आवाज ऐकू आला नाही. धन गुरू नानक, धन गुरू गोबिंद चे नाम सिमरन करीत ते गोदावरी मध्ये घोड्यांसहित पाण्यात अलोप झाले. सगळे नौकर वर्ग घाबरले आणि विचारात पडले कि फुलाजी यांना जाऊन काय उत्तर द्यावे परंतु त्या घडीला मोठा चमत्कार घडला. साहेब अजेय कमाल श्री गुरु गोबिंद सिंग जी स्वतःहून गोदावरीत उतरले आणि आपले भक्त श्री जेथजी यांच्या घोड्याची लगाम हातात धरून सर्व घोड्यांसहित बाबा जेथसिंघ यांना पलीकडे किनार्यावर आणून सोडले.
दुसर्या किनार्यावर बसलेल्या सगळ्या नोकरांनी बाबा जेठाजी आणि घोड्यांना चमत्कारी रूपाने बाहेर निघताना पाहिले आणि आश्चर्यचकित झाले.
ते पुन्हा फुलाजी कडे गेले झालेली सगळी घटना त्यांना सांगितली. इथे या किनार्यावर बाबा जेठाजी यांनी दशमेश पिता श्री गुरुगोविंद सिंग जी यांच्या चरणांवर डोकं ठेवून त्यांना विचारले की आपण माझ्यासारख्या तुच्छ जीवा करिता एवढी तकलीफ का घेतली आपण फक्त दर्शन जरी दिले असते तर माझा जीवन सफल झाला असता. आपण भेटल्याने माझ्या सगळ्या कामांना पूर्ण झाल्या आहेत आणि आपण मला जीवनातून मुक्ती द्यावी. गुरुगोविंद सिंग जी यांनी जेठाजी यांना जवळ घेऊन वचन केले की तुझे जीवनात अजून उद्देश पूर्ण नाहीये तुझ्याकडं आम्हाला संसारिक सेवा घ्यायची आहे. हे ऐकून जेठाजीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले व त्यांनी गुरुजींना विनंती केली की, माझ्या घरी या मला सेवेच्या मोका द्या. त्यावेळेस सद्गुरुजींनी वचन केले की वेळ येईल जेठा जेव्हा माझे सिंग तुझ्या घरी येतील आणि त्यांची सेवा चाकरी तन-मन-धनाने तू करशील तर तुला माझे दर्शन होईल .
खालसा मेरा रूप हे खास, खालसा मे हु करू निवास
गुरुजींनी सांगितले कि आता वेळ तुझ्या आई-वडिलांची परिवाराची आणि संसाराची सेवा करण्याची आहे. तुला माझी दर्शन सचखंड श्री हजूर साहेब नांदेड च्या धरतीवर होतील. इतके वचन करून दशमेश पातशहा पुन्हा गोदावरी नदी मध्ये अंतर द्यान झाले आणि आपल्या स्वामीचे दर्शन पाहू जेठाजी धन्य होऊन दौलताबाद कडे निघाला. फुलाजी आणि नगर निवासी जेठाजींची शोध घेण्यासाठी मागे निघाले, तेव्हापर्यंत गोदावरी नदी शांत झाली होती. शोधत शोधत सगळे दौलताबाद पर्यंत पोहोचले तिथे जेठाजी घोड्यांची विक्री करून किंमत घेत होते आणि पुन्हा अहमदनगर कडे निघाले होते.

त्यावेळेस दौलताबादच्या बाहेर फुलाजी आणि नगर निवासी यांनी बाबा जेठाजी यांना घोड्या बरोबर पायी येताना पाहिलं तर त्यांना विचारलं तुम्ही पायी का चालत आहात यावर जेठाजी यांनी सांगितले की ज्या घोड्याची लगाम कलगीधर दशमेश पिताना धरली आहे त्यावर मी कस काय सवारी करू शकतो. यावेळेस सगळ्यांनी बाबाजी यांना नमन केले व घोड्यांना देखील चरण स्पर्श केले. या पश्चात फुलाजींनी कधीच जेठाजी यांना भक्ती किंवा सेवा करण्यासाठी टोक लावली नाही, ते स्वतः त्याच्याबरोबर सेवा करू लागले आणि सेवा करीत असताना भक्ती आणि सत्संग मध्ये रमले असताना त्यांचे डोळे नेहमी सिंग साहेबांच्या रस्ता बघत असत. अनेक वर्षानंतर गुरुगोविंद सिंग जी यांनी भाई दयासिंगजी, भाई धरम सिंग जी, बाबा संभाजी यांना जाफरनामा साहेब घेऊन औरंगजेबला देण्याकरिता अहमदनगर येथे पाठवलं आणि त्यावेळेस सिंग साहेबांना बाबा जेठाजी यांच्या घरी राहण्याचे वचन दिले. त्यावेळेस वेळ अशी होती की छावणीतील लोकांनी सिंग किंवा शिखांना मदत केली तर त्यांनी आपले काळ आमंत्रित केलेले आहेत. इथे सिंग साहेबांच्या भेटीने बाबा जेठाशी आनंदित झाले होते आणि ते या क्षणाची आतुरतेने वाट बघत होते. परंतु वेळ आणि त्या वेळेची परिस्थिती पाहता 5 सिंघानी बाबा जेठाजी यांच्या घरी ना राहण्याचा निर्णय व आदेश केला. कारण त्यांना बाबा जेठाजी आणि त्यांच्या परिवार वरती कुठलीही मुसिबत ना यावी हा त्याच्या मागचा कारण होता. या आदेशाने बाबा जेठाजी दुविधात पडले कारण दशमेश पिता गुरुगोविंद सिंग जी यांनी यांचा आदेश होता की सिंग साहेबांन तुमच्या घरी थांबतील आणि पंज प्यारे यांनी दिलेला आदेश देखील गुरुंचाच आदेश आहे .
यावर बाबा जेठाजींनी समजदारीने पाच सिंग साहेबांना विनंती केली की हा घर माझा नसून दशमेश पिता श्री गुरुगोविंद सिंग जी यांचा आहे आणि आपण या ठिकाणी त्यांच्या आग्याने आलेले आहत. आपण याच घराघरात राहावं ही विनंती आणि जसा आपला आदेश आहे की आपण माझ्या घरात न राहण्याचे वचन दिलं आहे तर माझं अजून एक घर आहे त्या ठिकाणी मी माझ्या परिवार सहित थांबतो. सिंग साहेबांना बाबा जेठाजी यांची श्रद्धा, प्रेम आणि सूजबूज ने प्रसन्न व प्रभावित झाले आणि त्यांनी त्यांच्या घरी राहण्याची सेवा स्वीकार केली. बाबा जेठाजींनी आपल्या परिवाराला नगरच्या बाहेर शेतात एका कुटियात स्थलांतरित केले आणि आपल्या परिवारात सहीत त्या ठिकाणी राहिला गेले. आपल्या परिवाराची जाण मालाची परवा ना करता त्यांनी गुरुगोविंद सिंग जी यांच्या आदेशाचा पालन केलं. त्यांनी चार महिने सिंग साहेबांची तन-मन-धनाने सेवा केली. जफरनामा औरंगजेबला पोहोचवण्यात मुसलमान मुरीद नायब सुभेदार हाजी सरदार शहा यांच्या साह्याताने 5 जनवरी 1707 मध्ये औरंगजेबला जफरनामा भर दरबारात देऊन वाचण्यात आले. त्यानंतर बाबा जेठाजी यांची विदाई घेऊन सिंग पुन्हा गुरुगोविंद सिंग जी यांच्याकडे निघाले, जाताना सिंग साहेबांनी चढदी कला व कृपा करून श्री साहेब म्हणजे तलवार किंवा किर्पाण बाबा जेठाजी यांना भेट दिली जी आता गुरुद्वारा गुरुनानक धर्मसाल सातारा हे गाव जे औरंगाबाद येथे आहे तिथे आज देखील सुशोबित आहे. सद्गुरु श्री गुरुगोविंद सिंग जी यांच्या आदेशानुसार बाबा संभालसिंग यांनी औरंगाबादच्या सातारा गावात येथे थांबून त्यांनी सीखीचा प्रचार सुरू केला. औरंगजेब यांना जफरनामा प्राप्त झाल्यानंतर त्यांची तब्येत अजून बिघडली, दोन महिन्यानंतर त्यांची मृत्यू झाली.
सिंग साहेबांना आपल्या घरी ठेवून त्यांची सेवा केली या कारणाने बाबा जेठाजी यांना देखील दोषी धरण्यात आले आणि स्थानीय प्रशासनाने त्यांची संपूर्ण संपत्ती जप्त करून अहमदनगर शहरातून त्यांना निष्काशीत करण्याचे आदेश दिले. काही वेळानंतर जेव्हा सद्गुरुजी पंजाबच्या लांब रस्ता पार करून दख्खनच्या धरतीवर सचखंड श्री हजूर साहेब नांदेड येथे पोहोचले त्यावेळेस बाबा जेठाजी परिवार सहित सद्गुरुजींचे दर्शन घेतले. त्या ठिकाणी बाबाजी यांना अमृतपान केले जेठालाल पासून जेठा सिंग झाले आणि गुरूंचा त्यांनी आशीर्वाद प्राप्त केले. सातारा औरंगाबाद येथे श्री गुरुगोविंद सिंग जी च्या आदेशानुसार बाबा संभालसिंघजी यांनी धर्मसाल पोचून तिथे गुरुद्वारा बनविले आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्या ठिकाणी ते सेवा करीत राहिले.
-हरजीतसिंह वधवा- 9423162727