चासची विकासाच्या दिशेने वाटचाल -पै. नाना डोंगरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- चास (ता. नगर) येथील नवनिर्वाचित सरपंच पै. युवराज कार्ले व माजी सरपंच राजेंद्र गावखरे यांचा स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी आजी-माजी सरपंच यांचा सत्कार केला. यावेळी नामदेव फलके, अरुण कापसे, पै. रावसाहेब कार्ले, सोसायटीचे चेअरमन भाऊ काळे, सदस्य अर्जुन कार्ले, इंद्रभान गोंडाळ, विठ्ठल पठारे, आप्पा जाधव, आबासाहेब गुंजाळ, गिताराम काळे, संदीप कार्ले, हेमंत कार्ले आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, चास गावात अनेक विकास कामे मार्गी लावून गावाची विकासाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. माजी सरपंच गावखरे यांच्या कार्यकाळात विविध कामे मार्गी लावण्यात आली. त्यांचा नेहमीच सामाजिक उपक्रमांसाठी पुढाकार राहिला. संस्थेच्या विविध सामाजिक कार्याला त्यांनी सहकार्य केले. नुतन सरपंच देखील विकासकामांना गती देऊन गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित सरपंच पै. युवराज कार्ले यांनी गावातील प्रलंबीत कामांना प्राधान्य देऊन विकास कामांना चालना देणार असल्याचे सांगून, सामाजिक संस्थेच्या विविध उपक्रमांना नेहमीच सहकार्य राहणार असल्याचे स्पष्ट केले.