• Thu. Mar 12th, 2026

कविता लेखन स्पर्धेतून विद्यार्थ्यांनी घडविले 2047 च्या भारताचे दर्शन

ByMirror

Oct 9, 2022

नेहरु युवा केंद्र व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने जिल्हास्तरीय युवा महोत्सवानिमित्ताचा उपक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी)- नेहरु युवा केंद्र, श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने चास (ता. नगर) येथील श्री नृसिंह विद्यालयात कविता लेखन स्पर्धा पार पडली. या स्पर्धेला शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनेने 2047 च्या विकासात्मक भारताचे वर्णन आपल्या कवितेतून मांडले. जिल्हास्तरीय युवा महोत्सवानिमित्त युवा उत्सव व युवा संवाद इंडिया 2047 उपक्रमातंर्गत ही स्पर्धा पार पडली.


या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी 2047 भारत कसा असेल? या विषयावर मनमोकळेपणे आपले विचार कवितेतून मांडले. स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्या कमल घोडके यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रा. रंगनाथ सुंबे, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, आदम शेख आदींसह शालेय शिक्षक उपस्थित होते.


प्राचार्या कमल घोडके यांनी 2047 भारत घडविण्यासाठी व विद्यार्थ्यांचे विचार मुक्तपणे समजवून घेण्यासाठी राबविण्यात आलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले. पै. नाना डोंगरे यांनी भारताची तंत्रज्ञान व विज्ञान क्षेत्रातील प्रगती पाहून आपला देश निश्‍चितच एक शक्तीशाली देश म्हणून पुढे येणार असल्याची भावना व्यक्त केली.


या कविता लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक-अक्षदा आंबेकर, द्वितीय- भक्ती शेलार व तृतीय- श्रृतिका शिंदे यांनी बक्षिसे पटकाविली. तर उत्तेजनार्थ- श्रध्दा घोडके, अक्षदा गाडेकर ठरले. स्पर्धेचे परीक्षण रंगनाथ सुंबे व आदम शेख यांनी केले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी शालेय शिक्षकांनी परिश्रम घेतले. या स्पर्धेसाठी नेहरु युवा केंद्राचे उपनिदेशक शिवाजी खरात, रमेश गाडगे यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *