उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादांनी दिली त्यांच्या कलेला दाद
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सविता रमेश फिरोदिया प्रशाळेच्या कला शिक्षिका गीतांजली रोहित लाहोर-लोटके यांनी अवघ्या एका तासात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे हुबेहुब व्यक्तीचित्र रेखाटले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्राच्या नियोजित इमारतीच्या कामाचे भूमिपूजनप्रसंगी शहरात आलेले उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना गीतांजली लोटके यांनी काढलेले रेखाचित्र भेट दिले. दादा देखील स्वत:चे रेखाचित्र पाहून भारावले, तर कला शिक्षिकेच्या कलेला त्यांनी दाद दिली. यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांनी लोटके यांचे विशेष कौतुक केले.
गीतांजली लोटके यांना नुकताच मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी (मुंबई) राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. त्या उपक्रमशील शिक्षिका असून, त्यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल देखील सर्वत्र अभिनंदन होत आहे.